देखावया लागी जव अनौतें पाहिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३०४

देखावया लागी जव अनौतें पाहिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३०४


देखावया लागी जव अनौतें पाहिलें ।
तव तनु मनु त्रिभुवनीं व्यापिलेंगे माये ॥१॥
नवलावो जालें जग हरिच होऊनि ठेलें ।
आठऊं विसरलें काय करुं ॥२॥
बापरखुमादेविवरविठ्ठलें साच केलें ।
लोह परिसेंसि झगटलें तैसें जालेंगे माये ॥३॥

अर्थ:-

हे श्रीकृष्ण अगोदर तुला मी माझ्याहून अनौते म्हणजे भिन्न समजून पहावयाला गेलो. तो शरीरांत मनांत व सर्व त्रिभुवनांत तूंच व्यापिला आहेस असे दिसले.काय चमत्कार झाला. सर्व जग हरिरुपच होऊन गेल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे हरिच आहे असे झाले. आता तुझा आठव करण्याचे विसरण्याचे असे राहिलेच नाही. लोखंडास परीस लागल्या बरोबर जसे ते सोनेच होते. त्याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलाने माझे खरे स्वरुप मला प्राप्त करून दिले असे माऊली सांगतात.


देखावया लागी जव अनौतें पाहिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३०४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.