संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

निळें हें व्योम निळें हें सप्रेम – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३०

निळें हें व्योम निळें हें सप्रेम – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग  ३०


निळें हें व्योम निळें हें सप्रेम ।
निळेपणें सम आकारलें ॥१॥
नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म ।
नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥ध्रु०॥
निळेपणें वर्तो नीळेपणें खातों ।
निळपण पाहातो निळे पणें ॥२॥
ज्ञानदेव आला नीळवर्ण शाळा ।
निळे पण गोंवळा रातलीये ॥३॥

अर्थ:-
त्या परमात्म्यावरिल प्रेमामुळे त्याचे निळेपण घेऊन आकाश आकारले असुन सर्व जग ही निळेपण घेऊन सम झाले आहे. त्या परब्रह्माचा निळावर्ण पाहुन भक्त आपली कर्मे ही नीळस्वरुपातच करत आहेत व त्यामुळे तो आश्रम ही निळा झाला आहे. सर्व अन्न निळेच वाटत आहे. निळेपणेच प्रगट वर्तत आहे व पाहायला गेले तर सर्वत्र निळेपणच दिसत आहे. त्या निळेपणात मी रंगुन गेल्याने त्या परब्रह्माच्या निळेपणात मी लीन झालो आहे असे माऊली सांगतात.


निळें हें व्योम निळें हें सप्रेम – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *