मन मुरडोनि डोळां लेइलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३

मन मुरडोनि डोळां लेइलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३

मन मुरडोनि डोळां लेइलें ।
काळेपणें मिरवलें रुप त्याचें ॥१॥
बरवें रुप काळें अमोलिक ।
म्हणोनियां सांगतसे शुध्द भावें ॥ध्रुव॥
रखुमादेविवरु अगाध काळें ।
म्हणोनि सर्वत्र अर्पियलें ॥२॥

अर्थ:-
त्याचे काळेपण मिरवत असलेले रुप मी पाहिले तेंव्हा मन मारुन मी डोळ्यात साठवले. तेच काळेपण अनमोल असुन तेच मी शुध्द भावाने वर्णित आहे. ज्याने सर्व आकाश व्यापले तो रखुमाईचा पती अगाध (ठाईचा ) काळा आहे असे माऊली सांगतात.

वरील अभंग व्हिडिओ स्वरूपात पहा 

मन मुरडोनि डोळां लेइलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.