मनाचा भाव माझा खुंटला हरिध्यानें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २७

मनाचा भाव माझा खुंटला हरिध्यानें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २७

मनाचा भाव माझा खुंटला हरिध्यानें ।
अवघेंचि येणें मनें काळापिवन केलें ॥१॥
लघु म्हणो तरी सूक्ष्मही नव्हे ।
सूक्ष्म ह्मणो तरि अगाधही नव्हे ॥
या काळियाची जाली गे माये ॥ध्रु॥
बाप रखुमादेविवरु सुनीळ नीळकाळा ।
अवघ्या सहित गोपाळा बुडी दिधली गे माये ॥२॥

अर्थ:-
हरिध्याना मुळे माझ्या मनाचा भाव हरिरुपच झाला म्हणजे इतर गोष्टीसाठी खुंटला व त्या रुपाने काळाला ही पिऊन टाकले मी कालातीत झालो. ते रुप लघु म्हणावे तर सुक्ष्म नाही सुक्ष्म म्हणावे तर अगाध नाही. त्या काळियाने मला त्याची करुन टाकले. मी त्या रुपात बुडी दिली तो रखुमाईचा पती व माझे पिता आहेत असे माऊली सांगतात.

मनाचा भाव माझा खुंटला हरिध्यानें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.