श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २५२
श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा ।
इतरांचा लेखा कोण करी ॥१॥
राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचिया जोगे सिध्दि पावे ॥२॥
कल्पतरुतळवटीं जो कोणी बैसला ।
काय वाणी त्याला सांगिजोजी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों ।
आतां उध्दरलों गुरुकृपें ॥४॥
अर्थ:-
जीवब्रह्मैक्य ज्ञानदान करण्यामध्ये ईश्वरापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा श्रीगुरूचा पाठिंबा असेल तर इतर ज्या रिद्धिसिद्धी किंवा संसारिक सुखे यांची पर्वा कोण करील. मनाप्रमाणे सर्व ऐश्वर्य भोगण्यास मिळणाऱ्या राजाच्या बायकोला भीक मागावयाला जाण्याची पाळी येईल काय? किंवा कल्पतरूखाली बसलेल्या पुरूषास काय कमी आहे. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने माझा उद्धार झाला म्हणून मी संसार समुद्रांतून पार पडलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २५२
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.