सांवळेचें तेज सांवळे बिंबलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २५

सांवळेचें तेज सांवळे बिंबलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २५

सांवळेचें तेज सांवळे बिंबलें ।
प्रेम तें घातलें ह्रदयघटीं ॥१॥
निरालंब बाज निरालंब तेज ।
चित्तरस निज निजतेजें ॥ध्रु०॥
आदिमध्यंअत राहिला अनंत ।
न दिसे द्वैताद्वैत आम्हां रया ॥२॥
ज्ञानदेवीं सोय अवघाचि सामाय ।
सुखदु:ख माय आम्हां नाहीं ॥३॥

अर्थ:-
सावळ्या रुपाचे सावळे तेज सर्वत्र बिंबले असून ते प्रेमस्वरूप मी ह्रदयाच्या घटात घातले आहे. तो तेजाला तेज देणारा स्वयंपूर्ण आहे. अशा तेजामुळे माझे चित्तही तेजस्वी झाले. आदि मध्य, अंत, व्दैत, अव्दैत यापासून वेगळे असणारे ते अनंतरूप आहे. असा तो आमच्यामध्ये परिपूर्ण असल्याने आम्हाला सुखदुःख उरली नाहीत असे माऊली सांगतात.

सांवळेचें तेज सांवळे बिंबलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.