अरे अरे ज्ञाना झालासि पावन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २४५
अरे अरे ज्ञाना झालासि पावन ।
तुझें तुज ध्यान कळों आलें ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।
फ़िटला संदेह अन्यतत्त्वीं ॥२॥
मुरडूनियां मन उपजलासि चित्तें ।
कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ।
घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीची निवृत्ति आपणासकट ।
अवघेंची वैकुंठ चतुर्भुज ॥५॥
निवृत्ति परमअनुभव नेमा ।
शांति पूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥
अर्थ:-
निवृत्तीनाथ म्हणतात हे ज्ञानदेवा तुझे तुलाच ब्रह्मरूपाने ध्यान कसे करावे हे कळले म्हणून तू फार पवित्र झाला आहेस. तुझा देव व तुझा भाव तुझा तूंच आहेस. तुझा सर्व संदेह जाऊन अद्वैततत्त्वाविषयीचा तुझा सर्व संदेहनष्ट झाला आहे.मनाला मरड घातल्यामळे तझ्या चित्तांत बोध उत्पन्न झाला. आता तुला परमात्मव्यतिरिक्त रिते असे काही दिसत नाही.दिव्यांत जसे दिव्यातले तेज मावळावे त्याप्रमाणे सर्व वृत्ति मनातल्या मनात नाहीशा होऊन परमात्म तत्त्वाच्या ज्ञानावर अंतःकरणवृत्ती उत्पन्न होऊन सर्व प्रपंच्यांत गेल्या. परमात्म तत्वाच्या ज्ञानावर अंतकरण वृत्ती उत्पन्न होऊन वावरणारी वृत्ती ज्ञानशून्य होऊन गेली. अंतःकरणाची वृत्ति जीवभावासकट नाहीशी झाल्यामुळे सर्व त्रैलोक परमात्मरुप झाले.निवृत्तीरायांच्या या परम अनुभवाच्या शिकवणीने मला शांती क्षमा दी पूर्ण प्राप्त झाल्या असे माऊली सांगतात.
अरे अरे ज्ञाना झालासि पावन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २४५
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.