स्वरुपीं पाहतां बिंबीं बिंब उमटे ।
तें मेघ:श्याम दाटे बुंथि मनीं ॥१॥
चित्त वित्त हरि जाला वो साजणी ।
अवचिता आंगणीं म्यां देखियला ॥ध्रु०॥
सांवळा डोळसु चतुर्भुज रुपडें ।
दिसे चहूंकडे एक तत्त्व ॥२॥
ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसूनि बाही ।
एका रुपें बाही तरशील ॥३॥
अर्थ:-
मेघशामाकडे पाहिले की त्या बिंबाचे प्रतिबिंब माझ्या मनात उमटले आहे. त्या सगुण रुपाला अंगणात मी अवचित पाहिला त्यामुळे माझे चित्त व वित्त सगळेच मी विसरलो.त्या चतुर्भुज परमात्म्याला डोळ्यानी पाहिल्यावर ते एकतत्वाने सर्वत्र आहे हे मला जाणवले. त्या रुपाला एकत्वाने पाहिले तर सहज तरुन जाता येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.