सारसार दोन्ही । न दिसती नयनीं ।
अवचिता गगनीं । बिंबलासे ॥१॥
लोपले रविशशि । तेज न माये आकाशीं ।
मेघ:श्याम मेघाशीं । लपविलें ॥ध्रु०॥
दिव्यरुप तेज । तीव्र ना तेजबीज ।
कुंडलि विराजे । लोपलें सूर्यो ॥२॥
ज्ञानदेवा ध्यान । मनाचेंही मन ।
हरिचरण स्थान । दृढ केलें ॥३॥
अर्थ:-
सार असारचे रुप असलेले ते स्वरुप डोळ्याना दिसत नाही पण अवचित गगनात बिंबते. त्याच्या तेजाने आकाशातील चंद्र सुर्य हे त्या तेजात लोपले आहेत.ते तेज त्या आकाशात मावत नाही.जणुकाही त्या मेघःशामाने मेघालाही झाकुन टाकले. कुंडलिनी जागृत झाल्यावर जे दिव्य तेज त्या रुपावर निर्माण होते. ते तेज तिव्र नाही व त्यात सुर्य लोपला आहे. आम्ही मनाचे मन असलेले ते ब्रह्मपद त्या समचरणांमध्ये पाहतो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.