ज्ञानविज्ञान हरि । नांदे आमुच्या घरीं ।
बाह्यजु अभ्यंतरी जाला देव ॥१॥
काय सांगूं माय । त्रिभुवन धाय ।
पाहातां न समाय । नाना रुपीं ॥ध्रु०॥
चढत्या वाढत्या गोष्टी । प्रगट दिसे घटीं ।
नामरुपें वैकुंठीं । नेऊनि घाली रया ॥२॥
ज्ञानदेवा गोडी । हरिपदीं आवडी ।
प्रवृत्तीची थडी । उलंडिली ॥३॥
अर्थ:-
परमार्थ ज्ञान व संसाराचे विज्ञान होऊन आमच्या घरी नांदत आहे. असा तो देव बाहेर व भितरी एकच झाला. काय सांगु त्याची मात त्याला त्रिभुवन ध्याते व नाना रुपात ही तो समावत नाही भरुन उरतो. अत्यंत सुक्ष्म व अत्यंत प्रचंड वस्तुत तो भरलेला दिसतो असा अनेक रुपात व्यापलेला तो आपल्या भक्तांना वैकुंठात घेऊन जातो. माऊली ज्ञानेश्वर बोलतात त्याच्या वरील प्रेमामुळे मी संसारातील प्रवृतीची नदी ओलांडुन मी हरिप्रेमा काठावर पार झालो.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.