विज्ञानाचे ज्ञान अज्ञानीं घनवट – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१

विज्ञानाचे ज्ञान अज्ञानीं घनवट – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१

विज्ञानाचे ज्ञान अज्ञानीं घनवट ।
ज्ञानें अज्ञान नीट लाविलें दिसें ॥१॥
मी तूं हे मात हरपले दृष्टांत ।
ह्रदयीं ह्रदयस्थ निजतेजें ॥ध्रु०॥
साकार निराकार शून्याशून्य दिठा ।
रुपीं रुपवाटा हरि माझा ॥२॥
बापरखुमादेविवरु ह्रदयस्थ घटीं ।
बिंबोनि उफ़राटी कळा दिसे ॥३॥

अर्थ:-
प्रपंचाचे ज्ञान हे अज्ञानच असुन परमार्थ ज्ञानाने त्याला वाटेला लावले. त्यामुळे मनातील मी तु पण नष्ट होऊन हृदयात तो निजतेजाने स्थापित होतो. साकार निराकार शुन्याचे शून्य हे सर्व रुप घेऊन तो प्रगट झालेला माझा हरि आहे. असा जो रखुमाईचा पती हृदय घटात अवतरला तरी मूर्खाना तो वेगळा भासतो. असे माऊली बोलतात.

विज्ञानाचे ज्ञान अज्ञानीं घनवट – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.