गावी तिचें निरंजनीं वाडेरे ।
तीसवें पाडेरे ।
तिनें दैत्य मारिले कुवाडेरे गाईचें
सांगतां बहुत कुवाडेरे कान्हो ॥१॥
ते सांग पा धेनु कवण रे ।
तिसी नाहीं तिन्हीं गुणरे कान्हो ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुरे ।
ते उभी पुंडलिकाचे द्वारीरे कान्हो ॥३॥
अर्थ:-
एक परमात्मरूपी गाय निरूपाधिक निरंजन स्थितित आहे. तिची व्याप्ति विश्वरूपी वाड्यामध्ये असून तिला देव, दैत्य, व मानव अशी तीन पाडे म्हणजे पोरे आहेत. त्या तीन पोरातील असुर संपत्तीमान दैत्य सहज तिने मारून टाकले. त्या परमात्मरूपी गायीचे पवाडे सांगावे तेवढे थोडेच आहेत. ती गाय कोण आहे सांग पाहू तिला तिन्ही गुण नाहीत.माझे पिता व रखुमाईचे पती जे विठ्ठल, ती गाय असून ती पुंडलिकाचे द्वारी उभी आहे. असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.