पैल गोल्हाटमंडळ तो ।
त्रिकुटा वेगळा तो गे बाई ॥१॥
सहजबोधीं अनुभव तो ।
परमतत्त्वीं अनुराग तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो ।
ब्रह्म विटेवरी तो गे बाई ॥२॥
अर्थ:-
हे जीवरुप सखी सहा चक्रापलिकडील असलेले गोल्हाट तोच आहे. त्रिकुट चक्राहुन वेगळा असणारा तोच आहे. सहजपणे होणारा अनुभवरुपी बोध तोच आहे तर परमतत्वी अनुराग ही तोच आहे. तेच परब्रह्म विटेवर उभे आहे तेच रखुमाईचा पती आहे असे माऊली म्हणतात
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.