सारंगधरु तो ।
चक्रा आधारु हरि तो गे बाई ॥१॥
सुलभा सुलभ तो ।
आटकु नटके तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो ।
द्वैताद्वैतातीत तो गे बाई ॥२॥
अर्थ:-
हातात सुदर्शन चक्र धरणारा व सारंग नावाचे धनुष्य घेणारा, माझे जीवरुपी सखी तोच आहे. तो स्वरुपप्राप्तीला प्रतिबंध न करणारा सहज प्राप्त होणारा आहे. तो द्वैताद्वैता पलिकडील असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.