श्रुतिस्मृतिवचन तो ।
गुह्यागुह्य तो गे बाई ॥१॥
जागता निजता तो ।
निज चेवविता तो तो गे बाई ॥ध्रु०॥
परात्पर तो ।
रखुमादेविवरु तो गे बाई ॥२॥
अर्थ:-
श्रुती व स्मृतीनी सांगितलेली वचने तोच असुन तोच गौप्याचे गौप्य आहे म्हणजेच गुप्ताचे गुप्तत्व आहे. ज्ञानाने जागवणारा व अज्ञानामुळे झोपवणारा तोच असुन तो जीवाला चेतवणारा (चैतन्य रुप)ही तोच आहे. मायेच्या पलिकडील तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.