जरासंदुमल्लमर्दनु तो ।
गजपित्राहटणु तो गे बाई ॥१॥
कुब्जकपान तो ।
सुदाम्या अनुसंधान तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो ।
कंसचाणूरमर्दन तो गे बाई ॥२॥
अर्थ:-
हे जीवरुपी सखी जरासंधाला मल्ल युध्दातुन मारणारा व हत्तीला नक्रापासुन वाचवणारा तोच आहे. कुब्जेला भोग देणारा व सुदाम्याची मदत करणारा तोच आहे. कंस व चाणुर यांचे मंर्दन करणारा तो रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.