देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १००३
देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी ।
निजदेव नेणशी मुळीं कोण ॥१॥
देवा नाहीं रूप देवा नाही नांव ।
देवा नाही गांव कोठें कांहीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ।
अखंडित सेवा करा त्याची ॥३॥
अर्थ:-
देव, देव म्हणून निष्कारण लोक फिरत राहातात परंतु अंतर्मुख दृष्टी करुन हृदयातील देवाला कोणी ओळखत नाही. तात्त्विक पाहिले तर देवाला नाम, रुप, काही नाही. आत्मा हाच खरा देव असून त्याला ओळखून त्याची सतत सेवा करा म्हणजे त्याच्या ठिकाणी तल्लीन होऊन रहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १००३
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.