निळिये पेरणी । निळिये वाहाणी ।
गुणाचीं लेणीं । कृष्णवर्ण ॥१॥
नवलाव गे माय । नवलाव चोज ।
निळीं निळिमा काज । आकारलें ॥ध्रु०॥
नीळवर्ण तनु । नीळवर्ण गुणू ।
निळिमा पूर्णू । ह्रदयीं नांदे ॥२॥
ज्ञानदेवीं लीला । मननीं निवाला ।
निळिये अवलीळा । हरपला ॥३॥
अर्थ:-
त्या हृदयात निळेपणाचा परमात्मरुपी बीज घातल्यावर निळवर्णाची खाणच मिळाली. त्या निलवर्णाने सर्व गुण निळेच झाले आहेत. आश्चर्य आहे की माया ही निळीच आहे. व सर्व जगच निळे दिसत आहे. त्याचे शरिर निळे त्याचे गुण निळे संपुर्ण हृदयी निळेपणे आले आहे. त्याच्या निळवर्ण लीलेने मन उन्मन झाले व मी त्यात लीन झालो. असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.