रुप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥ध्रु०॥
बहुता सकृतांची जोडी । .
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥२॥
सर्व सुखाचें आगरु ।
बापरखुमादेविवरु ॥३॥
अर्थ:-
ज्ञानेश्वर माऊली हे मनरुपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रुप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले. तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव म्हणते. माझा गतजन्माच्या सकृतामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला. असा तो सर्व सुखाचे भांडार असलेला तो मला माझे आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.