सुकुमार सुरस परिमळें अगाध – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५३१
सुकुमार सुरस परिमळें अगाध ।
तयाचा सुखबोध सेवी आधीं ॥१॥
मन मारी सुबुध्दि तल्लीन मकरंदीं ।
विषय उपाधी टाकी रया ॥२॥
रखुमादेविवरु गुणाचा सुरवाडु ।
मन बुध्दि निवाडु राजहंसु ॥३॥
अर्थ:-
सुकुमार,सुरस असा परिमळ अगाध आहे. तेंव्हा त्याचा सुखोपभोग आधी घेऊ. मनाला मारुन मिळालेला सुबुध्दीरुप मकरंदाचा स्वाद घेताना विषय व उपाधी टाकुन देऊ. रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे गुणांची खाणी असुन ते मन व बुध्दी निवडुन घेणारे जणुकाही राजहंस आहेत असे माऊली सांगतात.
सुकुमार सुरस परिमळें अगाध – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५३१
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.