संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

पतीचा जिव्हाळा म्हणोनि सासुर्‍याचे साहिजे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २०९

पतीचा जिव्हाळा म्हणोनि सासुर्‍याचे साहिजे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २०९


पतीचा जिव्हाळा म्हणोनि सासुर्‍याचे साहिजे ।
येर्‍हवीं वाहिजे चामाची मोट ॥१॥
न पाहे वास न धरी मनीं आस ।
वायां निकण भुस काय उपणिसी ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे ॥
चाड नाहीं आम्हां दुजेविण ॥३॥
ज्ञानेश्वरमहाराजांचा बुध्दिरुपी

अर्थ:-

लग्न झालेली स्त्री आपल्या पतीच्या प्रेमाकरिता सासुसासऱ्यांचा जाच सहन करते. तसे जर नसेल तर एऱ्हवी कातड्यांची मोट म्हणजे नुसते शरीर रक्षण करून करावयाचे काय? या विचाराने नुसत्या शरीराचे रक्षण करावे अशी माझी दृष्टी नाही. व अन्य कोणत्याही प्रापंचिक विषयाविषयी आशा नाही. कारण ज्यामध्ये कण नाही. म्हणजे धान्य नाही असे नुसते भूस वाऱ्यावर कोण उपणीत बसेल? एवढ्याकरिता माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना सोडून इतर दुसऱ्या कशाचीही आम्हाला इच्छा नाही आम्हाला तो एकच पुरे. असे माऊली सांगतात.


पतीचा जिव्हाळा म्हणोनि सासुर्‍याचे साहिजे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २०९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *