पश्चिम मार्गी खूण बीजें दोन साजिरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८४५
पश्चिम मार्गी खूण बीजें दोन साजिरीं ।
अविनाश ओवरी योगीयांची ॥१॥
त्रिकूट श्रीहाट चंद्रसूर्य जाणा ।
पश्चिम मार्गी खूण याची की रे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे बीजे दोन बापा ।
पाहें आत्मरुपा तेथे बा रे ॥३॥
अर्थ:-
भुवयांच्यामध्ये आतील बाजूस दोन बीजे असलेले अग्नीचक्र आहे. त्याला योगीयांची अविनाश वोवरी म्हणतात. तिची त्रिकुट, श्रीहाट ही स्थाने असन तेथे चंद्रसुर्याच्या तेजाप्रमाणे तेज आहे. याचीच खूण पश्चिम मार्गी आहे. या दोन बीजात्मक अग्नीचक्रांत तुला आत्मरूप दिसेल रे बाबा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
पश्चिम मार्गी खूण बीजें दोन साजिरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८४५
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.