संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

निज ब्रह्मा ब्रह्म तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १७

निज ब्रह्मा ब्रह्म तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १७


निज ब्रह्मा ब्रह्म तो ।
ब्रह्मादिकां वंद्य तो गे बाई ॥१॥
अचिंतचिंतन तो ।
सारासार गुह्य तो गे बाई ॥ध्रु०॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलु तो ।
जनीं वनीं कृपाळु तो गे बाई ॥२॥

अर्थ:-
हे जीवरुप सखी, तो त्या भगवान ब्रह्म्याचा ब्रह्म आहे. व ब्रह्मादिकांना तोच वंदनिय आहे. तो अचिंतनाचे चिंतन तोच आहे. तो सारासार विचार करुन निघालेले गौप्य ( गीतेत गौप्याचे गुप्तधन गीतेला म्हंटले आहे ) आहे. तो सर्व चराचरावर कृपा करणारे रखुमाईचा पती व माझे पिता आहेत. असे माऊली सांगतात.


वरील अभंग व्हिडिओ स्वरूपात पहा 

निज ब्रह्मा ब्रह्म तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *