नेणते ठायीं मन पाहों गेलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३०५
नेणते ठायीं मन पाहों गेलें ।
तंव मरणचि पावले जागृतीगे माये ॥१॥
जागृती अंतीं स्वप्न देखिलें ।
जागृतीं स्वप्न दोन्ही हारपलें ॥२॥
रखुमादेविवरु मरणधरणा भ्याला ।
तेणें मज दाविला तेजोमय ॥३॥
अर्थ:-
जें परमात्मतत्त्व मनाने जाणले जात नाही. त्याला मन पहावयाला गेले असता तें मनच स्वप्नरुप जागृतीला प्राप्त झाले. व जागे झाल्या नंतर त्याने प्रपंच हा स्वप्नासारखा मिथ्या पाहून स्वप्न व जागृति दोन्ही हारपली. मरण धरण्याला भ्यालेला जो मी त्या मला रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी तेजोमय परमात्मा दाखविला असे माऊली सांगतात.
नेणते ठायीं मन पाहों गेलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३०५
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.