संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

नयनाचे आंगणीं तुर्येचा प्रकाश – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८७३

नयनाचे आंगणीं तुर्येचा प्रकाश – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८७३


नयनाचे आंगणीं तुर्येचा प्रकाश ।
उन्मनी उल्हास तयावरी ॥१॥
श्वेत शाम कळा प्रकाश आगळा ।
स्वयंज्योति बाळा लक्ष लांवी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे कैसे हे नयन ।
चैतन्याची शून्य आन नाहीं ॥३॥

अर्थ:-

योगी लोकांना ‘तुर्या’ नामक चौथी अवस्था प्राप्त झाली म्हणजे त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचे तेज येते व पुढील उन्मनी अवस्थेत मन उल्हासीत होते अशा स्थितीत जिच्या ठिकाणी काळा, पांढरा वगैरे रंग आहेत अशी आत्मज्योती दिसते. तिकडे लक्ष ठेवावे. हे च डोळ्यांतील तेज चैतन्याचे असून दुसरे कांही एक नाही हीच त्याची खूण आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


नयनाचे आंगणीं तुर्येचा प्रकाश – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८७३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *