नव्हे त्याची दुराश म्यां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६३२
नव्हे त्याची दुराश म्यां
सांडिली वो आस ।
ज्ञानवैराग्यभक्तिसार वोळला वो माय ॥१॥
संभोगवोवरीं होतिये निदसुरी ।
योगिणी खेचरी मज
जागविलें वो माय ॥२॥
ऐसा हा योगुराजु
तो विठ्ठल मज उजू ।
बापरखुमादेविवर देऊं ठेलें
वो माय ॥३॥
अर्थ:-
वस्तुतः सत्य नसलेल्या स्त्री धन पुत्रादि पदार्थाची मी आजपर्यंत आशा करात होतो. परंतु माझी दूराशाच झाली. ती मी नित्यानित्य विचाराने टाकून दिली आणि नित्य वस्तूच्या प्राप्तीकरिता ज्ञान आणि वैराग्य आणि श्रीहरिच्या भक्तीरसाकडे वळलो. किंवा मी दुराशा टाकून दिल्यावर ज्ञान वैराग्य आणि भक्ति ही माझ्याकडे धावून आली. आणि त्याच्या माग सच्चिदानंद घन जो श्रीविठ्ठल तोही धावून माझ्यावर अनुग्रह करण्याकरता आला. त्यामुळे मला त्याची प्राप्ती झाली. व त्या परमात्मनंदाच्या अंतपुरांत मी स्वस्त निजलो असता जीवन्मुक्तीच्या विशेष भोगार्थ योगसाधनादि खेचरी मुद्रा तिने मला जागे केले. असे हे माझे पिता व रखुमाईचे पती योगेश्वर श्रीविठ्ठल, त्यानी हे सोपे पारमार्थिक धन मला दिले असे माऊली सांगतात.
नव्हे त्याची दुराश म्यां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६३२
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.