माझ्या कान्हाचें तुम्हीं नाव भरी घ्यावों – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३८
माझ्या कान्हाचें तुम्हीं नाव भरी घ्यावों ।
ह्रदयीं धरोनि तुम्ही खेळावया न्यावो ॥१॥
भक्तांकारणें येणें घेतलीसे आळी ।
दहा गर्भवास सोसिले वनमाळी ॥२॥
कल्पनेविरहित भलतया मागें ।
अभिमान सांडूनी दीनापाठीं लागे ॥३॥
शोखिली पुतना येणें तनू मोहियेले तरु ।
आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥
अर्थ:-
माझ्या कान्हाचे नांव तुम्ही प्रेमाने घ्या व हृदयाशी कवटाळुन तुम्ही ह्याला खेळावयास घेऊन जा. हा भक्तासाठी मोहित होतो व त्याच्या साठी दहा गर्भवासाचे दुःख ही निमुट भोगतो. त्याला ह्याची आजिबात कल्पना नाही व तो कोणत्याही भक्तासाठी हेच करतो. स्वतःला आभिमान येऊ न देता कोणत्याही दीन भक्तामागे धावतो. त्या पुतनेने मायेने त्याला मोहित करण्याचा प्रयत्न केला तर ह्यांने तिलाच शोषुन घेतले. असे माझे पिता व रखुमाईचे पती भक्तांचा छंद मात्र टाकुन देत नाही. असे माऊली सांगतात.
माझ्या कान्हाचें तुम्हीं नाव भरी घ्यावों – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३८
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.