माझिया घोंगडियावरी ब्रह्माचा गोंडा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १११
माझिया घोंगडियावरी ब्रह्माचा गोंडा ।
बाहिरी सांडा बैसावया ॥१॥
घोंगडें संतचरणी रुळे ।
श्रीरंगा रंगलें व्योमाकार ॥ध्रु०॥
रखुमादेविवरें विठ्ठलें दिधलें ।
अमोलिक जालें मोलेंविण ॥२॥
अर्थ:-
मला दिलेल्या बोधाच्या घोंगडीला ब्रह्माचा गोंडा लावलेला आहे. ही घोंगडी बाहेर नीट बसायला बाहेर घाला. त्यावर श्रीरंगात रंगलेले संतचरण रुळतील,आकाशाप्रमाणे व्यापक असलेल्या परमात्म्याच्या रंगात ते घोंगडे रंगविलेले आहे. रखुमाईचे पती श्री विठ्ठलांने हे अमोल घोंगडे मोल न घेताच दिले आहे. असे माऊली सांगतात.
माझिया घोंगडियावरी ब्रह्माचा गोंडा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १११
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.