जतनेलागीं जीवन ठेविलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६८२
जतनेलागीं जीवन ठेविलें ।
विश्वरुप हारपलें ज्ञानपंथी ॥१॥
माझी दोन्ही सामावली दोन्ही सामावली ।
निजब्रह्मीं गुंडाळिली मनेंरहित ॥२॥
अवघा कोल्हाळ एकनिष्ठ जाला ।
ब्रह्मरसीं बुडाला निवडेचिना ॥३॥
रखुमादेविवर जगाचें जीवन ।
त्याचेंही मीपण गेलें विठ्ठलनामें ॥४॥
जतनेलागीं जीवन ठेविलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६८२
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.