जप तप कर्म क्रिया नेम धर्म – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६०
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वाघटीं राम भावशुध्द ॥१॥
न सोडी रे भावो टाकीरे संदेहो ।
रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ॥२॥
जाती वित्त गोत कुळ शीळ मात ।
भजे कां त्त्वरित भावना युक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
तेणें वैकुंठभुवनीं घर केलें ॥४॥
जप तप कर्म क्रिया नेम धर्म – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६०
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.