संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

जन्मोजन्मींच्या सायासीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६

जन्मोजन्मींच्या सायासीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग  ७६


जन्मोजन्मींच्या सायासीं ।
विठ्ठल लाधला पुंडलिकासी ॥१॥
पूर्वी पुण्य केलें वो माये ।
विटे लाधले या विठोबाचे पाये ॥२४॥
रखुमादेविवरु आहे ।
तया तीर्था केधवां जाती पाय ॥६॥

अर्थ:-
अनेक जन्मीच्या पुण्याईमुळे मोठ्या कष्टाने पुंडलिकरायांना श्रीविठ्ठलाची प्राप्ती झाली. महान पुण्याईमुळे विटेवर श्रीविठ्ठलाचे चरण त्याला दिसले त्या पंढरी क्षेत्रास माझे पाय चालून केव्हा जातील व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल मी केंव्हा पाहिन असे माऊली सांगतात.


जन्मोजन्मींच्या सायासीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *