दुरि ना जवळी त्रिभुवनमंडळी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६१३
दुरि ना जवळी त्रिभुवनमंडळी ।
ते मनाचा मुळीं बैसलेंसे ॥१॥
पाहतां न दिसे भानुप्रकाशें ।
येर्हवी तें असे मशकिं रया ॥२॥
बोलों जातां येणें जिव्हाचि खादली ।
पाहातां पाहातां नेली चर्मदृष्टी ॥३॥
दांतेविण जेणें स्थूळदेह खादले ।
शस्त्रेविण छेदिले लिंगदेह ॥४॥
त्त्वंपदिं सिध्द निवृत्ति लाधलें ।
गुरुलक्षीं लक्ष हारपलें ॥५॥
निवृत्तिदासा तुम्ही बहुत न बोला ।
रखुमादेविवरा ध्याइजेसु उगला ॥६॥
दुरि ना जवळी त्रिभुवनमंडळी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६१३
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.