ज्ञानाचें गरोदर वाढलें परपुरुषें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३३८
ज्ञानाचें गरोदर वाढलें परपुरुषें
व्यभिचारिणीं ऐसें म्हणती
लोक वो माय ॥१॥
नव्हे व्यभिचारिणी नाहीं मज कोणी ।
पाहतां निर्वाणी सहज
जोडलें वो माय ॥२॥
निवृत्ति पुराडला देहेभाव चोखाळला ।
अंगेंसि मर्दिला ब्रह्मरसु
वो माय ॥३॥
आतां उजरणी येई भ्रांती
नलगे माझ्या चित्तीं ।
उजरणी सहजगती
जाली वो माय ॥४॥
आतां असो हें बोलणें
दुर्जना हें सांगणें ।
चिदानंदघन तेणें वाढ्लें
वो माय ॥५॥
ऐसा देखणिया देखिला
निजगुप्त प्रकाशला ।
तो रखुमादेविवरु मज
फ़ावला वो माय ॥६॥
ज्ञानाचें गरोदर वाढलें परपुरुषें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६३८
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.