भ्रुवामध्यें तेज चंद्रसूर्यविरहित – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८४४
भ्रुवामध्यें तेज चंद्रसूर्यविरहित ।
आदी मध्य अंत संचलेंसे ॥१॥
तुर्यारुपें ते सुषुम्ना प्रकाशली ।
नवविध अमृतजळीं तया तेजा ॥२॥
ज्ञानदेव वदे अष्टांग योग साध ।
पावाल ब्रह्मपद याचा भेद ॥३॥
अर्थ:-
दोन भुवयांमध्ये अग्नीचक्राच्या ठिकाणी चंद्रसूर्याखेरीज जे तेज आहे. ते आदीमध्यांत पसरले आहे तेथे नऊ प्रकारच्या अमृतमय जलामध्ये तुर्यारूपाने सुषुम्ना नाडी प्रकाश करते. तुम्ही योगाभ्यास करा म्हणजे ब्रहारूप व्हाल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
भ्रुवामध्यें तेज चंद्रसूर्यविरहित – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८४४
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.