भ्रम धरिसी या देहाचा विठ्ठल – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३५

भ्रम धरिसी या देहाचा विठ्ठल – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३५

भ्रम धरिसी या देहाचा विठ्ठल
म्हणे कारे वाचा ॥१॥
पडोन जाईल हें कलेवर ।
विठ्ठल उच्चारी पा सार ॥२॥
रखुमादेविवरु अभयकारु ।
मस्तकीं ठेविला हा निर्धारु ॥३॥

अर्थ:-

उगाच मी म्हणजे देह हा भ्रम धरतोस.पण विठ्ठलनाम घेत नाहीस. हा देह कधी ही पडुन जाईल तेंव्हा साररुप विठ्ठल नाम उच्चार. असे नाम घेणाऱ्याच्या डोक्यावर रखुमाईचा पती आपला अभयकर ठेवतो.

भ्रम धरिसी या देहाचा विठ्ठल – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.