बहुतादां वर्हाडा आलेसी बाळा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५२१
बहुतादां वर्हाडा आलेसी बाळा ।
हांसती लोक परी न संडी चाळा ॥१॥
एकाचें खाये एकासि गाये ।
लाज नाहीं तिसी सांगावे काये ॥२॥
वर्हाडियांच्या भुलली सुखा ।
सुख भोगितां पावली दु:खा ॥३॥
नाथिलें पुसे भलत्यासि रुसे ।
जयाचें लेणें लेऊनि थोर संतोषें ॥४॥
क्षणाचा सोहळा मानिलें हित ।
आपस्तुति परनिंदेचें गीत ॥५॥
कवणाचें वर्हाड भुललीस वायां ।
शरण रिघें रखुमादेविवरा नाह्या ॥६॥
अर्थ:-
हे मुली, तू अनेक वेळा जन्ममरणरूपी लग्नाला विषयरूपी वऱ्हाडबरोबर घेऊन आलीस तुझ्याकडे बघून साधुसंत हंसतात. पण तू मात्र जन्ममरणाचा चाळाटाकीत नाहीस. परमात्म्याच्या सत्तेवर तुझे जगणे आहे. पण तू कौतूक मात्र शरिराचे करीतेस. याची तुला मुळीच लाज वाटत नाही. अशा तिला काय म्हणावे.विषयातल्या सुखाला भूलून ते सुख भोगीत असता तुला दुःखच होते.मला नित्य सुख असावे असे खोटेच विचारून परमतत्त्वालाच विसरून जातेस. परमात्म्याच्या सुखाचा अलंकार घालून तुला आनंद होतो व पहावे तर परमात्म्यालाच विसरून जाते. क्षणिक विषयसुखात आनंद मानून स्वतःची अशी स्तुती व दुस-याची निंदा हेच गीत नेहमी गात बसतेस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विषयरूपी वहाड कोणाचे त्यांचा तुझा कांही एक संबंध नसता फुकट भुलून गेली आहेस. म्हणजे त्या विषयात निमग्न झाली आहेस. परंतु तू विषयरूपी वहाडाचा त्याग करून रखुमादेवीवर बाप जो श्रीविठ्ठलत्याला शरण जा.
बहुतादां वर्हाडा आलेसी बाळा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५२१
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.