आकाश हें असें माझें शिर बापा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८५७
आकाश हें असें माझें शिर बापा ।
कर्ण दिशा चिद्रूपा नाद उठती ॥१॥
आधारापासूनी सहस्त्रदळावरी ।
नि:शब्द निरंतरी नारी एक ॥२॥
ज्ञानदेव म्हणे अनुभव ऐसा जेथें ।
तोचि जीवन्मुक्त संत योगी ॥३॥
अर्थ:-
ज्या योग्याला असे वाटते की आकाश हे माझे मस्तक आहे. दिशा माझे कान आहे. त्या दिशारुप आकाशांत ज्ञानाचा आवाज उठतो. आधार चक्रापासून सहस्रदळापर्यंत अशी एक कुंडलिनी नाडी आहे. असा ज्याला अनुभव आहे. तोच जीवन्मक्त, संत योगी आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
आकाश हें असें माझें शिर बापा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८५७
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.