अद्वैत पेठेहुनी घोंगडें आणिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ११५
अद्वैत पेठेहुनी घोंगडें आणिलें ।
अमोलिक घेतलें पंढरिये ॥१॥
चौ हातांची भरणी आली ।
तिये चराचरीं ऐसें नाहीं ॥२॥
रखुमादेविवरु विठ्ठलीं नीट ।
पांघुरविलें वैकुंठ मज देखा ॥३॥
अर्थ:-
अद्वैताच्या बाजारांतून हे परमात्मरूपी अमोलिक आणलेले घोंगडे आम्ही पंढरीस घेतले. हे लांबी रुंदीला परिपूर्ण असून असे दुसरे घोंगडे चराचरांत नाही. या रखुमाईचे पती श्रीविठ्ठलानी मला हे घोगडे नीटपणे पांघरविले आहे. असे माऊली सांगतात.
अद्वैत पेठेहुनी घोंगडें आणिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ११५
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.