आठवितां विसरले आपुलिया गोता – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३०
आठवितां विसरले आपुलिया गोता ।
हरिनामें त्त्वरिता मोक्ष जाला ॥१॥
त्याचें नामचि त्त्वरित प्रल्हादें
केलें प्रसन्न ।
तेणें संजिवन जाले त्याचे देह ॥२॥
बापरखुमादेविवरु नृसिंहरुपें देखे ।
दैत्य हरिखें धरी जानु ॥३॥
अर्थ:-
त्या परमात्म्याचे नुसते स्मरण झाले तरी कुळ गोत सर्व काही विसरायला होते. त्या हरिनामाने त्वरित मोक्ष ही प्राप्त झाला. प्रल्हादाने ते हरिनाम घेऊन परमात्म्याला प्रसन्न करुन घेतले त्यामुळे त्याचा देह संजिवन अवस्थेला गेला.माझे पिता व रखुमाईचे पती ह्यांनी घेतलेले नृसिंहरुप घेऊन हिरण्यकश्यपु दैताला मांडीवर घेऊन मारलेले पाहिले.
आठवितां विसरले आपुलिया गोता – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३०
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.