आपुलेंनि रंगे येति होति साजणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४२
आपुलेंनि रंगे येति होति साजणी ।
तंव वनवासीं एके आळंगिलेगे माये ॥१॥
बोलेंना बोलों देईना ।
तेथें पाहणें तें पारुषलेंगे माये ॥२॥
आपुलें केलें कांहींच नचले वो आतां ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला देखतां ॥३॥
अर्थ:-
हे सखी मी माझ्या नादात वनातुन येत असताना एका वनवासीने मला येऊन आलिंगन दिले. तो स्वतः ही काही बोलत नव्हता व मला ही बोलु देत नव्हता. त्याच्याकडे पाहणे ही मला जमले नाही. अशा त्या माझ्या पित्याला रखुमाईच्या पती विठ्ठलाला पाहिले की आपले काही चालत नाही असा माझा अनुभव आहे असे माऊली सांगतात.
आपुलेंनि रंगे येति होति साजणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४२२
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.