दासबोध दशक विसावा

दासबोध दशक चवथा

दासबोध दशक चवथा विडिओ आणि ऑडिओ सहित



समास १ ते ५

समास १ ते ५ अर्थ

समास ६ ते १०

समास ६ ते १० अर्थ


॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दशक चवथा : नवविधा भक्ती

समास पहिला : श्रवणभक्ती
॥ श्रीराम ॥

जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था ।
अध्यात्मविद्येच्या परमार्था । मज बोलवावें ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, श्री गणनाथाचा जयजयकार असो. हे गणनाथा, तू विद्यावैभवाने संपन्न असून ती दुसऱ्यास देण्याचे सामर्थ्यही तुजपाशी आहे. अध्यात्मविद्येचे रहस्य असा जो परमार्थ तो माझ्याकडून आपणच वदवून घ्यावा. (१)

नमूं शारदा वेदजननी । सकळ सिद्धि जयेचेनी ।
मानस प्रवर्तलें मननीं । स्फूर्तिरूपें ॥ २॥
वेदजननी जी शारदा तिला मी वंदन करतो. तिच्या कृपेने सर्व कार्ये सिद्धीला जातात. तिच्या कृपेनेच स्फूर्तिरूपाने माझे मन चिंतनात प्रवर्तले आहे. (२)

आतां आठऊं सद्गु रु । जो पराचाहि परु ।
जयाचेनि ज्ञानविचारु । कळों लागे ॥ ३॥
नंतर श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ अशा श्रीसद्‌गुरूचे स्मरण करू. कारण गुरुकृपेमुळेच ज्ञानविचार कळू लागतो. (३)

श्रोतेन पुसिलें बरवें । भगवद्भजन कैसें करावें ।
म्हणौनि बोलिलें स्वभावें । ग्रंथांतरीं ॥ ४॥
श्रोत्यांनी चांगला प्रश्न केला आहे की, भगवद्‌भजन कसे करावे ? म्हणून स्वाभाविकच निरनिराळ्या ग्रंथांतील भगवद्- भजनासंबंधीची वचने येथे सांगतो. (४)

सावध हो‍ऊन श्रोतेजन । ऐका नवविधा भजन ।
सत्शाहस्त्रीं बोलिले, पावन- । हो‍ईजे येणें ॥ ५॥
तरी श्रोत्यांनी सावध होऊन नवविधा भक्तीसंबंधी सतूशास्त्रात जे वर्णन आले आहे ते ऐकावे व त्यायोगे पावन व्हावे. (५)

श्लोक ॥ श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
अर्थ- श्रवण, कीर्तन, श्री विष्णूचे नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत. (१)

नवविधा भजन बोलिलें । तेंचि पुढें प्रांजळ केलें ।
श्रोतीं अवधान दिधलें । पाहिजे आतां ॥ ६॥
याप्रमाणे शास्त्रात जे नऊ प्रकारचे भजन सांगितले आहे, त्याचेच सविस्तर वर्णन पुढे केले आहे. तरी श्रोत्यांनी आता नीट लक्ष द्यावे. (६)

प्रथम भजन ऐसें जाण । हरिकथापुराणश्रवण ।
नाना अध्यात्मनिरूपण । ऐकत जावें ॥ ७॥
नऊ प्रकारांपैकी पहिले भजन कसे असते, ते ऐकावे. भगवंतांच्या कथा ऐकाव्यात, पुराण श्रवण करावे आणि नाना प्रकारे अध्यात्मनिरूपण केले जाते, तेही ऐकावे. (७)

कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
योगमार्ग वैराग्यमार्ग । ऐकत जावे ॥ ८॥
कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धान्तमार्ग योगमार्ग, वैरुग्यमार्ग इत्यादी सर्वांचे श्रवण करीत जावे. (८)

नाना व्रतांचे महिमे । नाना तीर्थांचे महिमे ।
नाना दानांचे महिमे । ऐकत जावे ॥ ९॥
नाना व्रतांचे महत्त्व, नाना तीर्थांचे महत्त्व व नाना दानांचे माहात्म्य ऐकत जावे. (९)

नाना माहात्म्यें नाना स्थानें । नाना मंत्र नाना साधनें ।
नाना तपें पुरश्चरणें । ऐकत जावीं ॥ १०॥
नाना माहात्म्ये, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना प्रकारचे तप व नाना पुरश्चरणे यासंबंधीचे वर्णन ऐकत जावे. (१०)

दुग्धाहारी निराहारी । फळाहारी पर्णाहारी ।
तृणाहारी नानाहारी । कैसे ते ऐकावे ॥ ११॥
दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पानाहारी, तृणाहारी असे नाना प्रकारचे आहार घेणारे लोक कसे असतात, ते ऐकावे. (११)

उष्णवास जळवास । सीतवास आरण्यवास ।
भूगर्भ आणी आकाशवास । कैसे ते ऐकावे ॥ १२॥
कुणी उन्हात राहणारे, कुणी पाण्यात राहणारे, कुणी थंडीत शहणारे, कुणी अरण्यात राहणारे, तर कुणी जमिनीत खड्डा खणून त्यात राहणारे, तर कुणी आकाशात राहणार कसे असतात, ते ऐकावे. (१२)

जपी तपी तामस योगी । नाना निग्रह हटयोगी ।
शाक्तआगम आघोरयोगी । कैसे ते ऐकावे ॥ १३॥
जप करणारे तप करणारे, अत्यंत तापट असणारे योगी, नाना प्रकारे निग्रह करणारे हठयोगी, शक्तिउपासक व कापालिक कसे असतात, ते सर्वही ऐकावे. (१३)

नाना मुद्रा नाना आसनें । नाना देखणीं लक्षस्थानें ।
पिंडज्ञानें तत्वज्ञानें । कैसीं तें ऐकावीं ॥ १४॥
योगशास्त्रात वर्णिलेल्या नाना मुद्रा, नाना आसने, नाना प्रकाशाची रूपे, ज्यावर मन सुलभतेने स्थिर करता येते अशी लक्ष्य स्थाने तसेच पिंडज्ञाने तत्त्वज्ञाने कशी आहेत तेही ऐकावे. (१४)

नाना पिंडांची रचना । नाना भूगोळरचना ।
नाना सृष्टीची रचना । कैसी ते ऐकावी ॥ १५॥
नाना प्राण्यांच्या शरीराची रचना, पृथ्वीवरील निरनिराळ्या प्रदेशांची रचना, नाना वृष्टीची रचना कशी झाली आहे, तेही ऐकावे. (१५)

चंद्र सूर्य तारामंडळें । ग्रहमंडळें मेघमंडळें ।
येकवीस स्वर्गें सप्त पाताळें । कैसीं ते ऐकावीं ॥ १६॥
चंद्र, सूर्य, तारांचे समूह, विविध ग्रहांचे समुदाय, मेघांचे समुदाय, एकवीस स्वर्ग आणि सक्षपाताळ यांचे विवरणही ऐकावे. (१६)

ब्रह्माविष्णुमहेशस्थानें । इन्द्रदेवऋषीस्थानें ।
वायोवरुणकुबेरस्थानें । कैसीं ते ऐकावीं ॥ १७ ॥
ब्रह्मा, विष्णू महेश यांची स्थाने, तसेच इंद्र, देव, ऋषी यांची स्थाने, वायू वरुण, कुबेर यांची स्थाने कशी आहेत तेही ऐकावे. (१७)

नव खंडे चौदा भुवनें । अष्ट दिग्पाळांची स्थानें ।
नाना वनें उपवनें गहनें । कैसीं ते ऐकावीं ॥ १८॥
नऊ खंडे चौदा भुवने, अष्ट दिक्पालांची स्थाने, तसेच नाना वने, उपवने, गहन अरण्ये यांची माहितीही ऐकावी. (१८)

गण गंधर्व विद्याधर । येक्ष किन्नर नारद तुंबर ।
अष्ट नायका संगीतविचार । कैसा तो ऐकावा ॥ १९॥
शिवगण, देवगण, गंधर्व, विद्याधर यक्ष, किन्नर, नारद, तुंबर इत्यादींची माहिती, तसेच अष्टनायिका आणि संगीतशास्त्र यांची माहितीही ऐकावी. (१९)

रागज्ञान ताळज्ञान । नृत्यज्ञान वाद्यज्ञान ।
अमृतवेळ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ॥ २०॥
रुगज्ञान, तालज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, मुहूर्तज्ञान, प्रसंगज्ञान कसे असते, तेही ऐकावे (२०)

चौदा विद्या चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा ।
बत्तीस लक्षणें नाना कळा । कैशा त्या ऐकाव्या ॥ २१॥
चौदा विद्या, चौसष्ट कला, हातावरील रेषांची लक्षणे, इतर कला, व माणसाच्या अंगी असणारी बत्तीस लक्षणे, वगैरे नाना कलांची माहिती ऐकावी. (२१)

मंत्र मोहरे तोटके सिद्धी । नाना वल्ली नाना औषधी ।
धातु रसायण बुद्धी । नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २२॥
मंत्र, विविधतोडगे, सर्व सिद्धी, नाना औषधी, मणी, नाना वल्ली, विविध धातू विविध रसायने तयार करण्याच्या क्रिया, नाडी परीक्षा इत्यादी गोष्टीही ऐकाव्यात. (२२)

कोण्या दोषें कोण रोग । कोणा रोगास कोण प्रयोग ।
कोण्या प्रयोगास कोण योग । साधे तो ऐकावा ॥ २३॥
कुठल्या दोषामुळे कुठला रोग होतो, कुठल्या रोगावर कुठल्या औषधाचा प्रयोग करावा, कुठल्या प्रयोगात कुठल्या योगावर आरंभ केला असता तो सिद्धीस जातो, हे सर्व ऐकून घ्यावे. (२३)

रवरवादि कुंभपाक । नाना यातना येमेलोक ।
सुखसुःखादि स्वर्गनर्क । कैसा तो ऐकावा ॥ २४॥
रौरव नरक, कुंभपाक नरक, इत्यादी नाना यातना ज्यात भोगाव्या लागतात ते सर्व नरक, तसेच यमलोक कसा आहे, स्वर्गातील सुख व नरकातील दुःख कसे असते, तेही सर्व ऐकावे. (२४)

कैशा नवविधा भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती ।
कैसी पाविजे उत्तम गती । ऐसें हें ऐकावें ॥ २५॥
नवविधा भक्ती कोणत्या आहेत, चार प्रकारच्या मुक्ती कोणत्या आहेत, उत्तम गती प्रास होण्यासाठी काय करावे, हे सर्व ऐकून घ्यावे. (२५)

पिंडब्रह्मांडाची रचना । नाना तत्वविवंचना ।
सारासारविचारणा । कैसी ते ऐकावी ॥ २६॥
पिंडब्रह्मांडाची रचना, नाना तत्त्वविवंचना तसेच सारासार विचार म्हणजे काय हेही ऐकावे (२६)

सायोज्यता मुक्ती कैसी होते । कैसें पाविजे मोक्षातें ।
याकारणें नाना मतें । शोधित जावीं ॥ २७॥
सायुज्यता मुक्ती कशी मिठ्ये, मोक्षाची प्राप्ती कशी होते, हे जाणून घेण्यासाठी नाना मतांचा शोध घ्यावा. (२७)

वेद शास्त्रें आणी पुराणें । माहावाक्याचीं विवरणें ।
तनुशतुष्टयनिर्शनें । कैसीं ते ऐकावीं ॥ २८॥
वेद, शाखे, पुतणे, महावाक्यावरील विवरणे तसेच चार देहांचे निरसन कसे करावे हे सर्व ऐकावे. (२८)

ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।
असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति ॥ २९॥
अशा रीतीने हे सर्व ऐकावे व विचार करून त्यातील सार शोधून काढावे व ते ग्रहण करावे. असार असेल ते जाणून घेऊन त्याचा त्याग करावा. यालाच श्रवणभक्ती असे नाव आहे. (२९)

सगुणाचीं चरित्रें ऐकावीं । कां तें निर्गुण अध्यात्में शोधावीं ।
श्रवणभक्तीचीं जाणावीं । लक्षणें ऐसीं ॥ ३०॥
भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन ऐकावे तसेच त्याचे निर्गुण स्वरूपही तत्त्वमीमांसेने जाणून घ्यावे ही श्रवणभक्तीची लक्षणे होत. (३०)

सगुण देवांचीं चरित्रें । निर्गुणाचीं तत्वें यंत्रें ।
हे दोनी परम पवित्रें । ऐकत जावीं ॥ ३१॥
भगवंताची सगुण चरित्रे व निर्गुणाची तत्त्वे, यंत्रे ही दोन्ही परम पवित्र असल्याने ती ऐकावीत. (३१)

जयंत्या उपोषणें नाना साधनें । मंत्र यंत्र जप ध्यानें ।
कीर्ति स्तुती स्तवनें भजनें । नानाविधें ऐकावीं ॥ ३२॥
सगुण भक्तीसाठी जयंत्या, उपोषणे, नाना साधने, नाना मंत्र, यंत्र, जप व ध्याने तसेच भगवंताची कीर्ती, त्याची स्तुतिस्तोत्रे, भजने यांचे विविध प्रकार हे सर्व काही ऐकावे. (३२)

ऐसें श्रवण सगुणाचें । अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें ।
विभक्ती सांडून भक्तीचें । मूळ शोधावें ॥ ३३॥
याप्रमाणे सगुणाचे श्रवण करावे आणि निर्गुणाचे अध्यात्मनिरूपणाच्या योगे ज्ञान करून घ्यावे थोडक्यात म्हणजे वेगळेपणाचा त्याग करून ऐक्यतेचे, भक्तीचे मूळ शोधावे, भगवंताशी एकरूपता कशी होईल हे जाणून घ्यावे. (३३)

श्रवणभक्तीचें निरूपण । निरोपिलें असे जाण ।
पुढें कीर्तन भजनाचें लक्षण । बोलिलें असे ॥ ३४॥
आत्तापर्यंत श्रवणभक्तीचे निरूपण केले. आता पुढे कीर्तनभजनाचे लक्षण सांगितले जाईल. (३४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रवणभक्तिनिरूपणनाम समास पहिला ॥ १॥
इति श्रीदासवोथे गुरुशिष्यसंवादे ‘श्रवणभक्तिनाम’ समास पहिला समास


समास दुसरा : कीर्तनभक्ती
॥ श्रीराम ॥

श्रोतीं भगवद्‌भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें बोलिलें ।
त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, श्रोत्यांनी भगवद्यजनासंबंधी प्रश्न केला. ते भगवद्‌भजन नऊ प्रकारचे आहे म्हणून सांगितले. प्रथम श्रवणाचे वर्णन केले. आता दुसरा प्रकार ‘ कीर्तन ‘ त्याचे वर्णन ऐका. (१)

सगुण हरिकथा करावी । भगवत्कीर्ती वाढवावी ।
अक्षंड वैखरी वदवावी । येथायोग्य ॥ २॥
भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन करवे, नित्य हरिकथा र करावी. भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करावे, ती वाढवावी. आपल्या वैखरी वाणीचा अखंड यथायोग्य उपयोग करून भगवद्यणवर्णन तिचेकडून अखंड करवावे. (२)

बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें ग्रन्थांतर ।
भगवत्कथा निरंतर । करीत जावी ॥ ३॥
खूप पाठांतर करावे, खूप ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील सारांश कंठस्थ करावा व निरंतर भगवंताची कथा सांगत जावी. (३)

अपुलिया सुखस्वार्था । केलीच करावी हरिकथा ।
हरिकथेवीण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४॥
स्वतःचे हित साधण्यासाठी, म्हणजेच मनुष्यजन्म सार्थकी लावून भगवखती करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी. त्याशिवाय कधी राहूच नये. (४)

नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेप अत्यंतचि करावा ।
हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मगोळ अवघा ॥ ५॥
हरिकथेत रोज नित्य नवा रस उत्पन्न होईल असा हव्यास धरावा. त्यासाठी खूपच प्रयत्न करावा. सर्व ब्रह्मांड हरिकीर्तनाने दुमदुमून सोडावे. (५)

मनापासून आवडी । जीवापासून अत्यंत गोडी ।
सदा सर्वदा तांतडी । हरिकीर्तनाची ॥ ६॥
हरिकीर्तनाची अगदी मनापासून आवड असावी. त्याची गोडी अगदी जीवाभावापासून असावी आणि सदासर्वदा हरिकीर्तनाचीच उत्कंठा असावी. (६)

भगवंतास कीर्तन प्रिये । कीर्तनें समाधान होये ।
बहुत जनासी उपाये । हरिकीर्तनें कलयुगीं ॥ ७॥
भगवंतास कीर्तन अत्यंत प्रिय आहे. कीर्तनानेच समाधान प्रास होते. श्रोता व वक्ता यांना समाधान देऊन बहुजनसमाजाचाही उद्धार होण्याकरिता कलियुगात हरिकीर्तन हाच उत्तम उपाय आहे. (७)

विविध विचित्रें ध्यानें । वर्णावीं आळंकार भूषणें ।
ध्यानमूर्ति अंतःकरणें- । लक्षून, कथा करावी ॥ ८॥
भगवंताच्या विविध आणि अद्‌भुत रूपांचे वर्णन करावे. त्याच्या वस्त्रालंकारांचे, भूषणांचे वर्णन अशा प्रकारे करावे की, अंतःकरणात ते ध्यान ठसले पाहिजे, अशा रीतीने भगवंताचे ध्यान मनात धरून कथा करावी. (८)

येश कीर्ति प्रताप महिमा । आवडीं वर्णावा परमात्मा ।
जेणें भगवद्भkक्तांचा आत्मा । संतुष्ट होये ॥ ९॥
भगवंताचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप व महिमा अत्यंत आवडीने अशा प्रकारे वर्णावा की, जेणेकरून तो ऐकत असता भगवद्‌भक्ताचा आत्मा संतुष्ट होईल. (९)

कथा अन्वय लापणिका । नामघोष करताळिका ।
प्रसंगें बोलाव्या अनेका । धात माता नेमस्त ॥ १०॥
भगवन् कथा सांगताना सुसंगती असावी. शब्दपांडित्य, वस्तूत्व असावे. अधूनमधून भगवंताच्या नामाचा घोष करावा. सर्वांनी रुळया वाजवाव्या. प्रसंगानुसार पुराणादी शास्त्रीय ग्रंथातून वर्णिलेले दृष्टान्तादी प्रसंग, तसेच प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचे दृष्टान्त यांचा उपयोग विवेचन नीट समजण्याकरिता करावा. (१०)

ताळ मृदांग हरिकीर्तन । संगीत नृत्य तान मान ।
नाना कथानुसंधान । तुटोंचि नेदावें ॥ ११॥
हरिकीर्तनात रंग भरण्यासाठी टाळ मृदुंग, संगीत, मृत्य, तानमान यांचा उपयोग करावा; पण या सगळ्यांमध्ये कथेचा मागचा, पुढचा संबंध तुटणार नाही, याची काळजी घ्यावी. (११)

करुणा कीर्तनाच्या लोटें । कथा करावी घडघडाटें ।
श्रोतयांचीं श्रवणपुटें । आनंदें भरावीं ॥ १२॥
कथा सांगताना करुण रसाचा आविष्कार व्हावा. करुणरसाचे लोट वाहतील अशी घडघडायने कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून यकावेत. (१२)

कंप रोमांच स्फुराणें । प्रेमाश्रुसहित गाणें ।
देवद्वारीं लोटांगणें । नमस्कार घालावे ॥ १३॥
कंप, रोमांच, स्कृरण, प्रेमाधू इत्यादी अष्टसात्त्विक भाव प्रगटहोतील अशा प्रकारेकथा करावी. प्रेमाने भगवंताचे गुणगान करून देवद्वारी लोयंगणे, नमस्कार घालावेत. (१३)

पदें दोहडें श्लोक प्रबंद । धाटी मुद्रा अनेक छंद ।
बीरभाटिंव विनोद । प्रसंगें करावे ॥ १४॥
प्रसंगानुसार पदे, दोहे श्लोक, प्रबंध, धाटी, मुद्रा, अनेक छंद, वीरश्री निर्माण करणारे भाषण व विनोद यांचा उपयोग करावा. (१४)

नाना नवरसिक श्रृंघारिक । गद्यपद्याचें कौतुक ।
नाना वचनें प्रस्ताविक । शास्त्राधारें बोलावीं ॥ १५॥
कथेमध्ये रुंगाससकट नवरस असावेत. उत्तम गद्य- पद्य वाङ्मय बोलावे. शास्त्राधारे प्रसंगाला अनुसरून नाना वचने बोलावीत. (१५)

भक्तिज्ञान वैराग्य लक्षण । नीतिन्यायस्वधर्मरक्षण ।
साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । प्रांजळ बोलावें ॥ १६॥
कीर्तनात भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची लक्षणे, तसेच नीती, न्याय व स्वधर्मरक्षण यासाठी काय करावे, विविध साधनमार्ग कोणते आहेत व परमात्मस्वरूप कसे आहे, यासंबंधीचे प्रांजळ निरूपण असावे. (१६)

प्रसंगें हरिकथा करावी । सगुणीं सगुणकीर्ति धरावी ।
निर्गुणप्रसंगें वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७॥
प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा. सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या सगुण चरित्राचे, कीर्तीचे वर्णन करावे, निर्गुणाचा प्रसंग असेल तर अध्यात्माचे निरूपण करून अध्यात्मविद्या वाढवावी. (१७)

पूर्वपक्ष त्यागून, सिद्धांत- । निरूपण करावें नेमस्त ।
बहुधा बोलणें अव्यावेस्त । बोलोंचि नये ॥ १८॥
प्रथम पूर्वपक्ष त्यागून नंतरसिद्धान्त निरूपण नेमस्तपणे म्हणजे यथायोग्य रीतीने करावे. शक्य तो विषयाला सोडून अस्ताव्यस्त बोलूच नये. (१८)

करावें वेदपारायेण । सांगावें जनासी पुराण ।
मायाब्रह्मीचें विवरण । साकल्य वदावें ॥ १९॥
वेदांचे पारायण करावे, लोकांना पुराण सांगावे, तसेच माया-ब्रह्म यासंबंधीचे सांगोपांग विवरण करावे. (१९)

ब्राह्मण्य रक्षावें आदरें । उपासनेचीं भजनद्वारें ।
गुरुपरंपरा निर्धारें । चळोंच नेदावी ॥ २०॥
ब्राह्मणधर्माचे आदराने रक्षण करावे, भगवंताची उपासना भजनाद्वारे रक्षण करावी आणि आपली गुरुपरंपस निर्धाराने टिकवून धरावी. तीस बाधा येऊ देऊ नये. (२०)

करावें वैराग्यरक्षण । रक्षावें ज्ञानाचें लक्षण ।
परम दक्ष विचक्षण । सर्वहि सांभाळी ॥ २१॥
वैराग्याचे रक्षण करावे, ज्ञानाचे लक्षण सांभाळावे, जो अत्यंत सावध व विचारवंत वक्ता असतो, त्याला हे सर्व जमते. (२१)

कीर्तन ऐकतां संदेह पडे । सत्य समाधान तें उडे ।
नीतिन्यायसाधन मोडे । ऐसें न बोलावें ॥ २२॥
कीर्तन ऐकून श्रोत्यांच्या मनातसदेहउत्यनहोईल आणि खयेखरचत्याचेसमाधाननष्टहोईलतसेचनीतिन्याय व साधन यात बाधा येईल, असे वक्ताने काहीही बोलू नये. (२२)

सगुणकथा या नांव कीर्तन । अद्वैत म्हणिजे निरूपण ।
सगुण रक्षून निर्गुण । बोलत जावें ॥ २३॥
सगुण कथेलाच कीर्तन असे म्हणतात. अद्वैताचे प्रति- पादन किंवा स्पष्टीकरण याला निरूपण म्हणतात; कीर्तनकाराने सगुणाचे महत्त्व रधून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. (२३)

असो वक्त्रु त्वाचा अधिकार । अल्पास न घडे सत्योत्तर ।
वक्ता पाहिजे साचार । अनुभवाचा ॥ २४॥
जो अल्प बुद्धीचा आहे, ज्याला अनुभव नाही, वस्तूत्व नाही, सर्व प्रकारे जो उणा आहे त्याला वस्तूत्वाचा अधिकार नसतो. जो खरोखर अनुभवी असेल तोच वक्ता होऊ शकतो. (२४)

सकळ रक्षून ज्ञान सांगे । जेणें वेदज्ञा न भंगे ।
उत्तम सन्मार्ग लागे । प्राणीमात्रासी ॥ २५॥
असा अनुभवी वक्ता सर्वांचे रक्षण करून ज्ञानाचे निरूपण करतो. ते अशा प्रकारे करतो की, वेदाज्ञेचा भंग न होता प्राणिमात्रांनी सन्मार्गास प्रवृत्त व्हावे. (२५)

असो हें सकळ सांडून । करावें गुणानुवादकीर्तन ।
या नांव भगवद्भंजन । दुसरी भक्ती ॥ २६॥
असो. हे सर्व राहू द्यावे. भगवंताच्या गुणानुवादाचे वारंवार कथन, गायन करणे यालाच दुसरे भगवद्धजन किंवा कीर्तनभक्ती असे म्हणतात. (२६)

कीर्तनें माहादोष जाती । कीर्तनें होये उत्तमगती ।
कीर्तनें भगवत्प्राप्ती । येदर्थीं संदेह नाहीं ॥ २७॥
कीर्तनाने मोठे दोष नाहीसे होतात, कीर्तनाने उत्तम गती मिळते; एवढेच नव्हे तर कीर्तनाने भगवसाक्षी होते, यात तिळमात्र संदेह नाही. (२७)

कीर्तनें वाचा पवित्र । कीर्तनें होये सत्पात्र ।
हरिकीर्तनें प्राणीमात्र । सुसिळ होती ॥ २८॥
कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने माणूस सत्पात्र बनतो, हरिकीर्तनाने सर्व भाविक श्रोते सदाचारी बनतात. (२८)

कीर्तनें अवेग्रता घडे । कीर्तनें निश्चये सांपडे ।
कीर्तनें संदेह बुडे । श्रोतयांवक्तयांचा ॥ २९॥
कीर्तनाने एकाग्रता साधते, कीर्तनाने भगवसाक्षीचा निश्चय दृढ होतो, कीर्तनाने श्रोत्यांचे व वक्तांचे सर्व संशय नष्ट होतात. (२९)

सदा सर्वदा हरिकीर्तन । ब्रह्मसुत करी आपण ।
तेणें नारद तोचि नारायेण । बोलिजेत आहे ॥ ३०॥
ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद सदासर्वदा हरिकीर्तन करीत असतात, म्हणून लोक त्यांना नारायणरूप मानतात. (३०)

म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा । कीर्तनें संतोषे परमात्मा ।
सकळ तीर्थें आणी जगदात्मा । हरिकीर्तनीं वसे ॥ ३१॥
म्हणून कीर्तनाचा महिमा अवर्णनीय आहे. कारण कीर्तनाने परमात्म्याला आनंद होतो. किंबहुना सर्व तीर्थे आणि भगवंत हरिकीर्तनात प्रत्यक्ष राहातात. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कीर्तनभजननिरूपणनाम समास दुसरा ॥ २॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘कीर्तनभक्तिनाम’ समास दुसरा समाप्त


समास तिसरा : नामस्मरणभक्ती
॥ श्रीराम ॥

मागां निरोपिलें कीर्तन । जें सकळांस करी पावन ।
आतां ऐका विष्णोःस्मरण । तिसरी भक्ती ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, यापूर्वी जी सकळांना पावन करते त्या कीर्तनभक्तीचे वर्णन केले. आता विष्णूचे स्मरण ही तिसरी भक्ती सांगतो, ती ऐका. (१)

स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।
नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २॥
भगवंताचे स्मरण करावे, त्याचे नाम अखंड जपावे. नामस्मरणानेच समाधान प्रास होते. (२)

नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं ।
नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥
नित्य नेमाने प्रातःकाळी, मध्याहकाळी, सायंकाळी एवढेच नव्हे तर सर्वकाळ नामस्मरण करीत असावे. (३)

सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां ।
नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥
सुखाचा प्रसंग असो वा दुःखाचा प्रसंग असो, मनात उद्वेग, चिंता असो अथवा मन आनंदरूप असो. कुठल्याही प्रसंगी नामस्मरणाशिवाय राहूच नये. (४)

हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं ।
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५॥
आनंदाचा प्रसंग असो किंवा संकटाचा प्रसंग असो, पर्वकाळ असो वा प्रयाणकाळ असो, विश्रांतीची वेळ असो अथवा झोपेची वेळ असो, सर्वकाळ नामस्मरण करावे. (५)

कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट ।
आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥
एखादी समस्या निर्माण झालेली असो, काही अडचण असो वा संकट असो किंवा संसारातील नाना खटपटी, लटपटी चाललेल्या असोत किंवा मनात कशाच्या तरी योगाने चिंता किंवा चुटपुट लागलेली असो, सर्व अवस्थांमध्ये नामस्मरण करीतच राहावे. (६)

चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥
चालताना, बोलताना उद्योगधंदा करताना, खाताना, जेवताना, सुखी असताना किंवा नाना उपभोग घेतानाही नाम कधी विसरू नये. (७)

संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥
काळगतीप्रमाणे कधी संपत्ती प्रास होईल तर कधी विपत्ती प्रास होईल, पण लौकिक स्थिती कशीही असली तरी त्यात खंड पडू देऊ नये. (८)

वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां ।
उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥
एखादे वेळी वैभव, सामर्थ्य, सत्ता आदी सर्व तसेच इतर प्रापंचिक पदार्थ यांची सुबत्ता झाली तरी त्या उत्कट भाग्यश्रीचा उपभोग घेत असताही नामस्मरण कधी सोडू नये. (९)

आधीं आवदसा मग दसा । अथवा दसे‍उपरी आवदसा ।
प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥
आधी वाईट परिस्थिती होती, पण नंतर परिस्थिती सुधारली अथवा याचे उलट आधी चांगली परिस्थिती होती ती जाऊन वाईट परिस्थिती आली, यांपैकी कुठलाही प्रसंग असो, पण प्रसंगी नाम मात्र कधी सोडू नये. (१०)

नामें संकटें नासतीं । नामें विघ्नें निवारती ।
नामस्मरणें पाविजेती । उत्तम पदें ॥ ११॥
नामाच्या योगे संकटे नाश पावतात, विध्यांचे निवारण होते आणि नामस्मरणाने माणूस श्रेष्ठ पदास पोहोचतो. (११)

भूत पिशाच्च नाना छंद । ब्रह्मगिर्ह्हो ब्राह्मणसमंध ।
मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥ १२॥
निष्ठेने नामस्मरण केले असता भूत, पिशाच्च इत्यादी नाना बाधा, नाना कपटे व ब्रह्मसमंध तसेच नाना मंत्रप्रयोग, व नाना प्रकारची करणी इत्यादींची पीडा टळते. (१२)

नामें विषबाधा हरती । नामें चेडे चेटकें नासती ।
नामें होये उत्तम गती । अंतकाळीं ॥ १३॥
नामाने विष बाधत नाही, चेटूक जादूटोणा इत्यादींचा प्रभाव पडत नाही. ती नाहीशी होतात आणि अंतकाळी नामाच्या योगे उत्तम गती प्रास होते. (१३)

बाळपणीं तारुण्यकाळीं । कठिणकाळीं वृधाप्यकाळीं ।
सर्वकाळीं अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४॥
बालपणी, तरुणपणी, संकयच्याकाळी किंवा वृद्धपणी सदासर्वकाळ तसेच अंतकाल आला असताही नामस्मरण चालूच असावे. (१४)

नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेसी विश्वेश्वर ।
वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेंकरूनी ॥ १५॥
नामाचा यथार्थ महिमा शंकरच जाणतात. तो विश्वेश्वर काशीत मरणाऱ्या जीवांना रामनामाचा उपदेश देऊन मुक्ती प्रास करून देतो. रामनामाच्या प्रभावानेच वाराणसी हे मुक्तिक्षेत्र ठरले आहे. (१५)

उफराट्या नामासाठीं । वाल्मिक तरला उठा‍उठी ।
भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ १६॥
उलट्या रामनामाच्या जपाने वाल्मीकीचा उद्धार झाला. एवढेच नव्हे तर भविष्यकाळी होणाऱ्या श्रीशमचरित्राचे वर्णन केले त्याचाच शतकोटी विस्तार झालेला आहे. (१६)

हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला ।
नारायेणनामें पावन जाला । अजामेळ ॥ १७॥
हरिनामाच्या योगेच नाना संकटंतून सुटका होऊन प्रहाद उद्धरून गेला आणि पापी अजामीळ नारायणाच्या नामस्मरणाने पावन झाला. (१७)

नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले ।
माहापापी तेचि जाले । परम पवित्र ॥ १८॥
नामाच्या प्रभावाने समुद्रात पाषाण तरले. असंख्य भक्त रामनामामुळे उद्धरून गेले. अत्यंत महापापी होते, ते परम पवित्र बनले. (१८)

परमेश्वराचीं अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें ।
नामस्मरण करितां, येमें- । बाधिजेना ॥ १९॥
परमेश्वराची अनंत नामे आहेत. त्यातील एखाद्या नामाचे नित्यनेमाने प्रेमाने स्मरण केले असता माणूस उद्धरून जातो. नामस्मरणाच्या प्रभावाने यमयातना भोगाव्या लागत नाहीत. (१९)

सहस्रा नामामधें कोणी येक । म्हणतां होतसे सार्थक ।
नाम स्मरतां पुण्यश्लोक । हो‍ईजे स्वयें ॥ २०
भगवंताच्या हजारो नामांपैकी कोणतेही एक नाम निष्ठेने घेत राहिल्यास मनुष्यजन्माचे सार्थक होते. नामस्मरण केल्याने ते करणारा स्वत: पुण्यात्मा बनतो. (२०)

कांहींच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१॥
इतर काहीही साधना न करता स्वतः फक्त रामनामाचा अखंड जप जर कुणी करीत राहील, तर त्यामुळे भगवान चक्रपाणी अत्यंत संतुष्ट होतात आणि त्या भक्ताचा सर्व प्रकारे सांभाळ करतात. (२१)

नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर ।
माहादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२॥
जो मनुष्य निरंतर नामस्मरण करतो, त्याचे शरीरही त्या नामाच्या प्रभावाने पुण्यमय होऊन जाते. रामनामामुळे महादोषांचे उतुंग पर्वतही नाश पावतात. (२२)

अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला ।
हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३॥
नामाचा महिमा अगाध आहे. त्याचे संपूर्ण वर्णन करताच येणार नाही. नामामुळे अनेक लोकांचा उद्धार झाला आहे. प्रत्यक्ष चंद्रमौळी शकरानादेखील हलाहल विषाची बाधा झाली नाही. (२३)

चहुं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लाहानथोर ।
जढ मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४॥
नामाचा अधिकार चारी वर्णाच्या लोकांना आहे. नामस्मरणाच्या बाबतीत लहान, थोर हा भेद नाही. अगदी जड छ, अडाणी, मूर्ख माणसेही नामामुळे सुखाने पैलतीर गाठतात. (२४)

म्हणौन नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें ।
तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥ २५॥
म्हणून अखंड नामस्मरण करीत राहावे व त्याचे रूप मनात आठवावे. ही तिसरी भक्ती होय. तिचे येथे यथार्थ वर्णन केले आहे, असे श्रीसमर्थ म्हणतात. (२५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
नामस्मरणभक्तिनिरूपणनाम समास तिसरा ॥ ३॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘नामस्मरणभक्तिनाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : पादसेवनभक्ती
॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । नामस्मरणाचें लक्षण ।
आतां ऐका पादसेवन । चौथी भक्ती ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात नामस्मरणभक्तीच्या लक्षणांचे निरूपण केले आता चौथी भक्ती जी पादसेवन तिचे लक्षण ऐका. (१)

पादसेवन तेंचि जाणावें । कायावाचामनोभावें ।
सद्गुaरूचे पाय सेवावे । सद्गणतिकारणें ॥ २॥
कायावाचामनोभावाने सद्‌गतिप्रासीसाठी श्रीसद्‌गुरूच्या चरणकमलांची सेवा करणे, ही पादसेवनभक्ती जाणावी. (२)

या नांव पादसेवन । सद्गुसरुपदीं अनन्यपण ।
निरसावया जन्ममरण । यातायाती ॥ ३॥
जन्ममरणाची यातायात कायमची चुकावी, म्हणून सद्‌गुरुचरणी अनन्य होणे यालाच पादसेवन म्हणतात. (३)

सद्गुरुकृपेविण कांहीं । भवतरणोपाव तों नाहीं ।
याकारणें लवलाहीं । सद्गुुरुपाय सेवावे ॥ ४॥
सद्‌गुरुकृपेशिवाय दुसरा काहीही भवतरणोपाय नाही हेजाणून घेऊन शक्य तितक्या लवकर श्रीसद्यरूंच्या चरणांची सेवा करू लागावे. (४)

सद्वस्तु दाखवी सद्गुसरु । सकळ सारासारविचारु ।
परब्रह्माचा निर्धारु । अंतरीं बाणे ॥ ५॥
श्री सद्‌गुरूच परमात्मवस्तूदाखवितात. सायससिवचार म्हणजे काय वगैरे सर्व कळून येते आणि परब्रह्माच्या स्वरूपासंबंधी निश्चय अंतःकरणात ठसतो. (५)

जे वस्तु दृष्टीस दिसेना । आणी मनास तेहि भासेना ।
संगत्यागेंविण ये ना । अनुभवासी ॥ ६॥
जी वस्तू डोळयांस दिसत नाही आणि मनानेही जी अनुमानता येत नाही, ती आत्मवस्तु संगाचा त्याग केल्याशिवाय अनुभवास येत नाही. (६)

अनुभव घेतां संगत्याग नसे । संगत्यागें अनुभव न दिसे ।
हें अनुभवी यासीच भासे । येरां गथागोवी ॥ ७॥
मी अनुभव घेतो, अशी वृत्ती जोपर्यंत असते, तोपर्यंत संगत्याग नसतो. ज्यावेळी संगत्याग घडतो तेव्हा अनुभव लक्षात येत नाही. द्वैत राहातच नाही. माझे हे बोलणे हे स्वानुभवीच जाणू शकतील इतरांना त्यात गोंधळ आहे असे वाटते. (७)

संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।
सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरूप ॥ ८॥
संगत्याग आणि आत्मनिवेदन, विदेहस्थिती आणि अलिप्तपणा, सहजस्थिती आणि उन्मनी म्हणजे मनातीतता, विज्ञान म्हणजेच स्वरूपानुभव ही सातही एकरूपच आहेत. (८)

याहिवेगळीं नामाभिधानें । समाधानाचीं संकेतवचनें ।
सकळ कांहीं पादसेवनें । उमजों लागे ॥ ९॥
या स्थितीला आणखी नावेही आहेत. पण स्वरूपानुभवाचे समाधान व्यक्त करणारी ती खुणेची वचनेच असतात. हे सर्व काही केवळ श्री सद्‌गुरूंच्या चरणसेवनानेच समजू लागते. (९)

वेद वेदगर्भ वेदांत । सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत ।
अनुभव अनुर्वाच्य धादांत । सत्य वस्तु ॥ १०॥
वेद, वेदांचे रहस्य, वेदान्त, सिद्धांचा मार्ग, त्यातील रहस्य व त्यांचे सिद्धान्त यांचा अनुभव हा अवर्णनीय असला तरी तो सत्यवस्तू असल्याने प्रत्यक्षच असतो. (१०)

बहुधा अनुभवाचीं आंगें । सकळ कळती संतसंगें ।
चौथे भक्तीचे प्रसंगें । गोप्य तें प्रगटे ॥ ११॥
आत्मानुभवाची अशी अनेक अंगे आहेत. ती संतसंगाने संतसमागमात कळू लागतात. चौथ्या भक्तीचे वर्णन करण्याच्या प्रसंगाने परमार्थातील अनेक गुप्त रहस्ये ० होत आहेत. (११)

प्रगट वसोनि नसे । गोप्य असोनि भासे ।
भासाअभासाहून अनारिसे । गुरुगम्य मार्ग ॥ १२॥
परमात्यवस्तू प्रगट असूनही नसल्यासारखी वाटते व अदृश्य असूनही मनाला जाणवते. भास आणि अभासाच्या अतीत अशी ही परमात्मवस्तू गुरुगण्य मार्गानेच जाणता येते. (१२)

मार्ग होये परी अंतरिक्ष । जेथें सर्वहि पूर्वपक्ष ।
पाहों जातां अलक्ष । लक्षवेना ॥ १३॥
गुरुगण्य मार्ग हा आत्मारामाशी ऐक्य पावण्याचा मार्ग आहे. तेथे इतर तर्क इत्यादी पूर्वपक्षांप्रमाणे टिकू शकत नाहीत. कारण स्वस्वरूप मन, बुद्धी इंद्रियादींनी जाणता येण्यासारखे नाही. (१३)

लक्षें जयासी लक्षावें । ध्यानें जयासी ध्यावें ।
तें गे तेंचि आपण व्हावें । त्रिविधा प्रचिती ॥ १४॥
त्या वस्तूस लक्ष देऊन आतमध्ये पाहाण्याचा प्रयत्न करावा, ध्यान धरून त्यास जाणावयाचा प्रयत्न करावा. मग तसे करताना ती वस्तूच स्वतः आपणच होतो. शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीती आणि आत्मप्रचीती ही त्रिविधा प्रचीती आहे. (१४)

असो हीं अनुभवाचीं द्वारें । कळती सारासारविचारें ।
सत्संगेंकरून सत्योत्तरें । प्रत्ययासि येतीं ॥ १५॥
असो. स्वस्वरूपानुभव प्रास करून घेण्याचे असे मार्ग आहेत. ते सागससिवचायने कव्यात व सत्संगाच्या योगे त्यांचा खरोखर अनुभव येतो. (१५)

सत्य पाहातां नाहीं असत्य । असत्य पाहातां नाहीं सत्य ।
सत्याअसत्याचें कृत्य । पाहाणारापासीं ॥ १६॥
परमात्मा सत्यस्वरूप आहे. त्याचा शोध घेऊ गेले की असत्याचा, मायिक वृष्टीचा लोप होतो. या उलट मायिक वृष्टीला खरे मानून त्यात गुरफटल्यावर सत्यस्वरूप परमात्मा दुरावतो. याप्रमाणे पाहणाऱ्यांच्या दृष्टीवर सत्य, असत्याची प्रचीती अवलंबून असते. (१६)

पाहाणार पाहाणें जया लागलें । तें तद्रूपत्वें प्राप्त जालें ।
तरी मग जाणावें बाणलें । समाधान ॥ १७॥
पाहाणारा परमावर पाहाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो वेगळा उरतच नाही, तदूप होऊन जातो. असा तो जेव्हा तदूप होतो, तेव्हाच त्याच्या अंगी समाधान बाणते. (१७)

नाना समाधानें पाहातां । बाणती सद्गुवरु करितां ।
सद्गुसरुविण सर्वथा । सन्मार्ग नसे ॥ १८॥
समाधान अनेक प्रकारे होत असले तरी सद्‌गुरूंच्या कृपेनेच अंगी बाणते. त्यांच्याशिवाय परमात्यप्राक्षीचा दुसस मार्गच नाही. (१८)

प्रयोग साधनें सायास । नाना साक्षेपें विद्याअभ्यास ।
अभ्यासें कांहीं गुरुगम्यास । पाविजेत नाहीं ॥ १९॥
नाना प्रयोग केले, ज्ञान, भक्ती, कर्मयोगादी अनेक साधने केली, निरनिराळ्या प्रकारे जप-तपादी सायास केले मोठ्या प्रयताने अनेकविद्यांचा अभ्यास केल, तरी गुरुकृपेमुळे जी प्राप्ती होते, ती दुसऱ्या कशानेही होऊ शकत नाही. (१९)

जें अभ्यासें अभ्यासितां न ये । जें साधनें असाध्य होये ।
तें हें सद्गुbरुविण काये । उमजों जाणे ॥ २०॥
जे अभ्यासाने प्रास होऊ शकत नाही, जे साधनांनी असाध्य आहे, त्याचे ज्ञान सद्‌गुरूशिवाय कसे काय होणार ? (२०)

याकारणें ज्ञानमार्ग- । कळाया, धरावा सत्संग ।
सत्संगेंविण प्रसंग । बोलोंचि नये ॥ २१॥
म्हणून ज्ञानमार्ग कळण्यासाठी सत्संग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सत्संगाखेरीज या गोष्टी बोलूसुद्धा नयेत. (२१)

सेवावे सद्गु रूचे चरण । या नांव पादसेवन ।
चौथे भक्तीचें लक्षण । तें हें निरोपिलें ॥ २२॥
सद्‌गुरूंच्या चरणांची सेवा याचेच नाव पादसेवन. याप्रमाणे चौथ्या भक्तीचे लक्षण येथे वर्णन केले आहे. (२२)

देव ब्राह्मण माहानुभाव । सत्पात्र भजनाचे ठाव ।
ऐसिये ठाईं सद्भााव । दृढ धरावा ॥ २३॥
देव, ब्राह्मण, आत्मज्ञानी संत व अत्यंत सात्त्विक सज्जन ही सेवेस योग्य स्थाने आहेत. त्यांच्या ठिकाणी दृढ सद्‌भाव धरावा. (२३)

हें प्रवृत्तीचें बोलणें । बोलिलें रक्षाया कारणें ।
परंतु सद्गुतरुपाय सेवणें । या नांव पादसेवन ॥ २४॥
हे जे मी सांगितले ते प्रवृत्तीचे बोलणे असून व्यवहार व परंपरा यांचे रक्षण व्हावे म्हणून सांगितले. परंतु वास्तविक सद्‌गुरु-चरणाची सेवा हीच खरी पादसेवन भक्ती होय. (२४)

पादसेवन चौथी भक्ती । पावन करितसे त्रिजगतीं ।
जयेकरितां सायोज्यमुक्ती । साधकास होये ॥ २५॥
ही पादसेवन नावाची चौथी भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी असून या भक्तीच्या योगेच साधकाला सायुज्यमुक्ती प्रास होते. (२५)

म्हणौनि थोराहून थोर । चौथे भक्तीचा निर्धार ।
जयेकरितां पैलपार । बहुत प्राणी पावती ॥ २६॥
म्हणून ही भक्ती श्रेष्ठांतही श्रेष्ठ आहे असे मी निर्धारपूर्वक सांगतो. तिच्या योगेच अनेक लोक या संसारसागराच्या पैलतीरास पोहोचले आहेत. (२६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पादसेवनभक्तिनिरूपणनाम समास चवथा ॥ ४॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ‘पादसेवनभक्तिनाम’ समास चौथा समाप्त.


समास पाचवा : अर्चनभक्ती
॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । चौथे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । पांचवी भक्ती ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागल्या समासात चौथ्या भक्तीचे लक्षण वर्णन करून सांगितले. आता सावध होऊन पाचवी भक्ती कशी असते ते ऐका. (१)

पांचवी भक्ती तें आर्चन । आर्चन म्हणिजे देवतार्चन ।
शास्त्रोक्त पूजाविधान । केलें पाहिजे ॥ २॥
अर्चन ही पाचवी भक्ती असून अर्चन म्हणजे देवतार्चन करणे, पण ते शास्त्रोक्त विधीप्रमाणे यथासांग केले पाहिजे. (२)

नाना आसनें उपकर्णें । वस्त्रें आळंकार भूषणें ।
मानसपूजा मूर्तिध्यानें । या नांव पांचवी भक्ती ॥ ३॥
नाना प्रकारची आसने, पूजेची उपकरणी, वस्त्रे, अलंकार- भूषणे यांनी पूजा करावी. मनात मूर्तीचे ध्यान करावे आणि तिची मानसपूजा करावी. ही पाचवी भक्ती आहे. (३)

देवब्राह्मणाग्नीपूजन । साधुसंतातीतपूजन ।
इति महानुभाव गाइत्रीपूजन । या नांव पांचवी भक्ती ॥ ४॥
देव, ब्राह्मण, अग्नी, साधु-संत, अतिथिअभ्यागत यांचे पूजन तसेच यती, ब्रह्मज्ञानी, संत, गाय, यांचे पूजन ही पण पाचवी भक्ती जाणावी. (४)

धातुपाषाणमृत्तिकापूजन । चित्र लेप सत्पात्रपूजन ।
आपले गृहींचें देवतार्चन । या नांव पांचवी भक्ती ॥ ५॥
धातू मृत्तिका, पाषाण यांच्या मूर्ती तसेच तसबिरी व गंधाच्या लेपाने भिंतीवर काढलेल्या उपासनामूर्ती किंवा संत यांची पूजा करावी. तसेच आपल्या घरातील देवाचीही पूजा करावी. याला पाचवी भक्ती म्हणतात. (५)

सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित ।
लिंगें सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्बदे ॥ ६॥
सात किंवा नऊ शुभचिहे असलेले दगड शाळिग्राम, चक्रांकित दगडाचे तुकडे, शिवलिंगे, सूर्यकांत, चंद्रकांत मणी, शंकराचे बाण, तांदळे व नर्मदेतील गोटे (६)

भैरव भगवती मल्लारी । मुंज्या नृसिंह बनशंकरी ।
नाग नाणी नानापरी । पंचायेत्नपूजा ॥ ७॥
तसेच भैरव, भगवती (देवी), मल्हारी, मुंज्या, नृसिंह, बनशंकरी, नाग, निरनिराळ्या प्रकारची देवतांचा छाप असलेली नाणी, पंचायतनाची म्हणजे गणेश, सूर्य, शक्ती, शिव व विष्णू या मुख्य पाच देवतांची पूजा, ही अर्चनभक्ती होय. (७)

गणेशशारदाविठलमूर्ती । रंगनाथजगंनाथतांडवमूर्ती ।
श्रीरंगहनुमंतगरुडमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ८॥
गणेश, शारदा, विठ्ठल यांच्या मूर्ती, तसेच रंगनाथ, जगनाथ, नटराज यांच्या मूर्ती, श्रीरंग, हनुमंत, गरुड यांच्या मूर्तीचे पूजन करावे. (८)

मत्छकूर्मवर्ह्हावमूर्ती । नृसिंहवामनभार्गवमूर्ती ।
रामकृष्णहयग्रीवमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ९॥
मक्य, कूर्म, वयह, नृसिंह, वामन, भार्गव यांच्या मूर्ती, राम, कृष्ण, हयग्रीव यांच्या मूर्तीचीही पूजा करावी. (९)

केशवनारायणमाधवमूर्ती । गोविंदविष्णुमदसूदनमूर्ती ।
त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती । रुषीकेश पद्मनाभि ॥ १०॥
केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर हृषीकेश, पद्यनाभ, (१०)

दामोदरसंकर्षणवासुदेवमूर्ती । प्रद्युम्नानुरधपुरुषोत्तममूर्ती ।
अधोक्षजनारसिंहाच्युतमूर्ती । जनार्दन आणी उपेंद्र ॥ ११॥
दामोदर संकर्षण, वासुदेव, प्रद्युस्त, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन व उपेंद्र यांच्या मूर्ती, (११)

हरिहरांच्या अनंत मूर्ती । भगवंत जगदात्माजगदीशमूर्ती ।
शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ १२॥
तसेच हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवंत, जगदात्मा, जगदीश यांच्या मूर्ती आणि शिवशक्तीच्या बहुविध मूर्ती देवतार्चनी पूजाच्या. (१२)

अश्वत्थनारायेण सूर्यनारायेण । लक्ष्मीनारायेण त्रिमल्लनारायेण ।
श्रीहरीनारायण आदिनारायण । शेषशाई परमात्मा ॥ १३॥
ऐश्या परमेश्वराच्या मूर्ती । पाहों जातां उदंड असती ।
त्यांचें आर्चन करावें, भक्ती- । पांचवी ऐसी ॥ १४॥
अश्वत्यनारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनाशयण, त्रिमल्लनारायण, श्रीहरिनासयण, आदिनारायण, शेषशायी, परमात्मा अशा परमेश्वराच्या मूर्ती दिसून येतात. त्यांचे अर्चन करणे ही पाचवी भक्तीच आहे. (१३ – १४)

याहि वेगळे कुळधर्म । सोडूं नये अनुक्रम ।
उत्तम अथवा मध्यम । करीत जावें ॥ १५॥
याशिवाय आपल्या घरी जे कुळधर्म जसे चालत आले असतील त्यांचे त्याप्रमाणेच पालन कमवे. त्यांचा अनुक्रम सोडू नये. उत्तम अथवा मध्यम कसेही असोत आपण ते करीत जावे. (१५)

जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी ।
पूजा मांगिणी जोगिणी । कुळधर्में करावीं ॥ १६॥
जाखमाता, मायसणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिणी, जोगिणी यांची पूजा कुलधर्माप्रमाणे करावी. (१६)

नाना तीर्थांक्षत्रांस जावें । तेथें त्या देवाचें पूजन करावें ।
नाना उपचारीं आर्चावें । परमेश्वरासी ॥ १७॥
नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जावे, तेथे त्या त्या देवतेचे पूजन करावे. नाना प्रकारच्या उपचारांनी परमेश्वराची अर्चना करावी. (१७)

पंचामृतें गंधाक्षतें । पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें ।
धूपदीप असंख्यातें । नीरांजनें कर्पुराचीं ॥ १८॥
नाना खाद्य नैवेद्य सुंदर । नाना फळें तांबोलप्रकार ।
दक्षणा नाना आळंकार । दिव्यांबरें वनमाळा ॥ १९॥
सिबिका छत्रें सुखासनें । माहि मेघडंब्रें सूर्यापानें ।
दिंड्या पताका निशाणें । टाळ घोळ मृदांग ॥ २०॥
नाना वाद्यें नाना उत्साव । नाना भक्तसमुदाव ।
गाती हरिदास सद्भाव- । लागला भगवंतीं ॥ २१॥
पंचामृते, गंधाक्षता, नाना प्रकारची फुले सुवासिक द्रव्ये, अनेक प्रकारचे धूप-दीप, असंख्य नीरांजने, कर्पूरार्ती, नाना खाद्ये, सुंदर नैवेद्य, नाना प्रकारची फळे व विड्याचे नाना प्रकार दक्षिणा, नाना अलंकार दिव्य अशी वस्त्रे, वनमाला, पालख्या, छत्रे, सुखासने, पाल्यीवर धरतात त्या उंच छत्र्या, अब्दागिरी, दिंड्या, पताका, निशाणे, जळ, घोळ, मृदुंग, अनेक प्रकारची वाद्ये देवाला अर्पण करावी. अनेक प्रकारचे उत्सव, त्यात एकत्रित होणारे भक्तांचे समुदाय आणि हरिदास, भगवंताचे गुणानुवाद भगवंतांच्या भक्तीत रंगून गाऊ लागतात. त्यामुळे आनंद उचंबळून येतो. (१८ – २१)

वापी कूप सरोवरें । नाना देवाळयें सिखरें ।
राजांगणें मनोहरें । वृंदावनें भुयरीं ॥ २२॥
पाण्याचे आठ विहिरी, सरोवरे नाना देवालये, त्यांची शिखरे मोठी अंगणे, सुंदर वृंदावने व तळघरे (२२)

मठ मंड्या धर्मशाळा । देवद्वारीं पडशाळा ।
नाना उपकर्णें नक्षत्रमाळा । नाना वस्त्र सामुग्री ॥ २३॥
मठ मोठमोठ्या माड्या, अथवा यात्रेच्या वेळी बाजारहाट मांडण्यासाठी केलेल्या मंडई, धर्मशाळा, तसेच देवद्वारी ओवऱ्या, नाना उपकरणी, नक्षत्रमाला, नाना वस्त्रे वगैरे सामग्री, (२३)

नाना पडदे मंडप चांदोवे । नाना रत्नघोष लोंबती बरवे ।
नाना देवाळईं समर्पावे । हस्थि घोडे शक्कटें ॥ २४॥
अनेक पडदे, चांदवे, मंडप, लोंबणारे मोत्यांचे रत्नांचे घोस, तसेच हत्ती, घोडे, रथ, गाड्या निरनिराळ्या देवालयांना अर्पण करावेत. (२४)

आळंकार आणि आळंकारपात्रें । द्रव्य आणी द्रव्यपात्रें ।
अन्नोदक आणी अन्नोदकपात्रें । नाना प्रकारीचीं ॥ २५॥
अलंकार आणि ते ठेवण्याच्या पेट्या, द्रव्य आणि ते ठेवण्याच्या पेट्या, अनोदक आणि त्यासाठी लागणारी ताटे, वाड्या, भांडी, पातेली, हंडे, कळशा वगैरे अनेक प्रकारची भांडी, देवाला अर्पण करावीत. (२५)

वनें उपवनें पुष्पवाटिका । तापस्यांच्या पर्णकुटिका ।
ऐसी पूजा जगन्नायका । येथासांग समर्पावी ॥ २६॥
वने-उपवने, पुष्पवाटिका, ल्लागा, फळबागा, तपस्वी लोकांना राहण्यासाठी झोपड्या असे सर्व समर्पण भावाने जगनायकाला यथासांग अर्पण करून याप्रकारे त्याची पूजा करावी. (२६)

शुक शारिका मयोरें । बदकें चक्रवाकें चकोरें ।
कोकिळा चितळें सामरें । देवाळईं समर्पावीं ॥ २७॥
पोपट सारिका, मोर बदके, चक्रवाक चकोर कोकिळा वगैरे पक्षी आणि चितळ सांबर याप्रकारची हरणे देवालयाला अर्पण करावी. (२७)

सुगंधमृगें आणी मार्जरें । गाई म्हैसी वृषभ वानरें ।
नाना पदार्थ आणी लेंकुरें । देवाळईं समर्पावीं ॥ २८॥
त्याचप्रमाणे कस्तुरीमृग, मांजरे, गाई, म्हशी, बैल, वानरे ही जनावरे आणि इतर नाना पदार्थ आणि लेकरे देवालयाला अर्पण करावीत. (२८)

काया वाचा आणी मनें । चित्तें वित्तें जीवें प्राणें ।
सद्भाaवें भगवंत आर्चनें । या नांव आर्चनभक्ती ॥ २९॥
काया, वाचा, मन, चित्त, वित्त म्हणजे पैसा अडका, जीव व प्राण थोडक्यात म्हणजे आपले सर्वस्व भगवंताच्या चरणी अर्पण करून अंतःकरणापासून त्याची पूजा करणे, याचे नाव अर्चनभक्ती आहे. (२९)

ऐसेंचि सद्गुभरूचें भजन- । करून, असावें अनन्य ।
या नांव भगवद्भजन । पांचवी भक्ती ॥ ३०॥
अशाच प्रकारे श्री सद्‌गुरूची पूजा करून त्यांना अनन्यभावाने शरण जाणे, याचेही नाव भगवद्‌भजन असून तीही पाचवी भक्तीच आहे. (३०)

ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी ।
मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ॥ ३१॥
अशा रीतीने बाह्योपचारांनी चांगली पूजा घडू शकली नाही तरी मानसपूजा तरी अगत्य करावी. (३१)

मनें भगवंतास पूजावें । कल्पून सर्वहि समर्पावें ।
मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३२॥
मनाने भगवंताचे पूजन करावे. मनाने कलून विविध उपचार आदी सर्व काही त्यास प्रेमाने अर्पण करावे. मानसपूजेचे लक्षण हे असे आहे. (३२)

जें जें आपणांस पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे ।
येणें प्रकारें कीजे । मानसपूजा ॥ ३३॥
आपल्याला देवाला जे जे अर्पण करावे अशी इच्छा असले, ते ते सर्व मनाने कलून त्यांच्या चरणी अर्पण करावे. या प्रकारे मानसपूजा अवश्य करावी. (३३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
र्चनभक्तिनाम समास पंचवा ॥ ५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘अर्चनभक्तिनाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : वंदनभक्ती
॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । पांचवे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । साहावी भक्ती ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात पाचव्या भक्तीचे लक्षण वर्णन करून सांगितले. आता सावध होऊन सहावी भक्ती कशी असते ते ऐका. (१)

साहावी भक्ती तें वंदन । करावें देवासी नमन ।
संत साधु आणी सज्जन । नमस्कारीत जावे ॥ २॥
वंदन करणे ही सहावी भक्ती आहे. म्हणून देवाला नमन करावे. संत, साधू आणि सजन यांना नमस्कार करीत जावे. (२)

सूर्यासि करावे नमस्कार । देवासि करावे नमस्कार ।
सद्गुारूस करावे नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३॥
सूर्याला, देवाला आणि सद्‌गुरूना साष्टांगभावाने नमस्कार करावा. (३)

साष्टांग नमस्कारास अधिकारु । नानाप्रतिमा देव गुरु ।
अन्यत्र नमनाचा विचारु । अधिकारें करावा ॥ ४॥
देवांच्या निरनिराळ्या प्रतिमा, देव आणि गुरू यांना साष्टांग नमस्कार घालावा, कारण ते त्या अधिकासस पात्र आहेत. इतरांना नमस्कार करताना त्यांचा अधिकार योग्यता पाहून यथायोग्य रीतीने करावा. (४)

छपन्न कोटी वसुमती । मधें विष्णुमूर्ती असती ।
तयांस नमस्कार प्रीतीं । साष्टांग घालावे ॥ ५॥
पृथ्वीचा विस्तार छप्पन कोटी योजने आहे. त्यात ठिकठिकाणी विष्यमूर्ती आहेत. त्यांना अत्यंत प्रेमाने साष्टांग नमस्कार करावेत. (५)

पशुपति श्रीपति आणी गभस्ती । यांच्या दर्शनें दोष जाती ।
तैसाचि नमावा मारुती । नित्य नेमे । म विशेष ॥ ६॥
शंकर विष्णू, सूर्य त्याचप्रमाणे मारुती यांना विशेष करून नित्यनेमाने वंदन केले असता, त्यांच्या दर्शनाने सर्व दोष नाहीसे होतात. (६)

श्लोक ॥ शंकरः शेषशायी च मार्तंडो मारुतिस्तथा ।
एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ॥
भक्त, ज्ञानी, वैराग्यसंपन्न पुरुष, स्वानुभवी ब्रह्मज्ञानी, तापसी, योगी आणि श्रेष्ठ व्यक्ती पाहून त्यांना तत्काळ नमस्कार करावा. (७)

भक्त ज्ञानी आणी वीतरागी । माहानुभाव तापसी योगी ।
सत्पात्रें देखोनि वेगीं । नमस्कार घालावे ॥ ७॥
वेद जाणणारा, शास्त्र जाणणारा, सर्व भूत, भविष्य, वर्तमान जाणणारा, विद्वान पंडित, पुराणिक आणि इतर विद्वज्जन, तसेच याज्ञिक, वैदिक आणि पवित्र लोक यांना नमस्कार करावा. (८)

वेदज्ञ शास्त्रज्ञ आणी सर्वज्ञ । पंडित पुराणिक आणी विद्वज्जन ।
याज्ञिक वैदिक पवित्रजन । नमस्कारीत जावे ॥ ८॥
जेथे जेथे काही विशेष गुण दिसून येतील, तेथे सद्यरूंचे अधिष्ठान आहे, असे जाणून त्यांना अत्यंत आदराने नमस्कार करावा. (९)

जेथें दिसती विशेष गुण । तें सद्गु रूचें अधिष्ठान ।
याकारणें तयासी नमन । अत्यादरें करावें ॥ ९॥
गणेश, शारदा, नाना शक्ती, हरिहरांच्या अवतार मूर्ती अशा रीतीने वेगवेगळ्या रूपाने नटलेल्या देवदेवता किती आहेत ते सांगावे म्हटले तरी पुरे पडणार नाही. (१०)

गणेश शारदा नाना शक्ती । हरिहरांच्या अवतारमूर्ती ।
नाना देव सांगों किती । पृथकाकारें ॥ १०॥
सगळ्या देवांना केलेला नमस्कार एका भगवंतालाच पोहोचतो. या अर्थाचे एक वचन आहे, ते ऐका. (११)

सर्व देवांस नमस्कारिलें । ते येका भगवंतास पावलें ।
येदर्थीं येक वचन बोलिलें- । आहे, तें ऐका ॥ ११॥
श्लोक ॥ आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं ।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
अर्थ-आकाशातून पडले पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार केशवाला जाऊन पोहोचतो.

याकारणें सर्व देवांसी । नमस्कारावें अत्यादरेंसीं ।
अधिष्ठान मानितां, देवांसी- । परम सौख्य वाटे ॥ १२॥
म्हणून सर्व देवांना अत्यंत आदराने नमस्कार करावेत. सर्वांच्या ठिकाणी एका भगवंताचेच अधिष्ठान आहे हे जाणून त्या भावाने देवांना नमस्कार केला असता, आपल्याला परम सौख्य वाटते. (१२)

देव देवाचीं अधिष्ठानें । सत्पात्रें सद्गुारूचीं स्थानें ।
या कारणें नमस्कार करणें । उभय मार्गीं ॥ १३॥
सर्व देवांच्या ठिकाणी भगवंताचे अधिष्ठान आहे आणि सर्व संतसज्जनांच्या ठिकाणी सद्‌गुरूचे वास्तव्य आहे, हे जाणून देवदेवतांना आणि सत्यात्र संतसज्जनांना नमस्कार करावा. (१३)

नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे ।
नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ॥ १४॥
नमस्काराने अंगी नसता येते. नमस्काराने मनातील शंका नाहीशी होते, नमस्कारामुळे निरनिराळ्या संतसज्जनांशी मैत्री, सख्य होते. (१४)

नमस्कारें दोष जाती । नमस्कारें अन्याय क्ष्मती ।
नमस्कारें मोडलीं जडतीं । समाधानें ॥ १५॥
नमस्कारामुळे दोष नाहीसे होतात. आपल्या हातून एखादा अन्याय घडला असला तरी ज्या व्यक्तीबाबत तो घडला असेल, त्या व्यक्तीस नमस्कार केला असता ती व्यक्ती क्षमा करते. नमस्कारामुळे दुभंगलेली मने परत जोडली जातात. बिघडलेले संबंध सुधारतात आणि समाधान लाभते. (१५)

सिसापरता नाहीं दंड । ऐसें बोलती उदंड ।
याकारणें अखंड । देव भक्त वंदावे ॥ १६॥
मस्तक नमविण्यासारखे दुसरे प्रायश्चित्त नाही, असे पुष्कळांनी म्हटले आहे. मस्तक नमवून देव व भक्तांना अखंड वंदन करावे. (१६)

नमस्कारें कृपा उचंबळे । नमस्कारें प्रसन्नता प्रबळे ।
नमस्कारें गुरुदेव वोळे । साधकांवरीं ॥ १७॥
वंदन केल्याने त्यांच्या अंतःकरणातील कृपा उचंबळून येते. नमनाने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि अशा नमस्कारामुळे साधकांवर सद्‌गुरू कृपा करतात. (१७)

निशेष करितां नमस्कार । नासती दोषांचे गिरिवर ।
आणी मुख्य परमेश्वर । कृपा करी ॥ १८॥
निष्काम भावनेने नमस्कार केला असता पापांचे पर्वत नष्ट होतात आणि मुख्य म्हणजे परमेश्वर कृपा करतो. (१८)

नमस्कारें पतित पावन । नमस्कारें संतांसी शरण ।
नमस्कारें जन्ममरण । दुरी दुर्ह्हावे ॥ १९॥
नमस्कायमुळे पतित असेल तो पावन होतो. मनःपूर्वक नमस्कार करून संतांना शरण जावे म्हणजे त्यांच्या कृपेने जन्ममरणाच्या चक्रातून कायमची सुटका होते. (१९)

परम अन्याय करुनि आला । आणी साष्टांग नमस्कार घातला ।
तरी तो अन्याये क्ष्मा केला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ २०॥
फार मोठा अपराध करून जरी एखाद्याने येऊन साष्टांग नमस्कार घातला, तर श्रेष्ठ पुरुषाने त्या अपसध्यास त्याच्या अन्यायाची क्षमा केली पाहिजे. (२०)

याकारणें नमस्कारापरतें । आणीक नाहीं अनुसरतें ।
नमस्कारें प्राणीयातें । सद्बु द्धि लागे ॥ २१॥
म्हणून नमस्कारासारखे अनुसरण्यास योग्य असे दुसरे साधन नाही. नमस्काराच्या योगे मनुष्याच्या ठिकाणी सद्‌बुद्धी उत्पन्न होते. (२१)

नमस्कारास वेचावें नलगे । नमस्कारास कष्टावें नलगे ।
नमस्कारांस कांहींच नलगे । उपकर्ण सामग्री ॥ २२॥
नमस्कारासाठी काही खर्च करावा लागत नाही. काही कष्ट करावे लागत नाहीत. इतर उपकरणे वा सामग्री असे काहीच लागत नाही. (२२)

नमस्कारा ऐसें नाहीं सोपें । नमस्कार करावा अनन्यरूपें ।
नाना साधनीं साक्षपें । कासया सिणावें ॥ २३॥
नमस्काससारखा सोपा दुसग उपाय नाही. मात्र तो नमस्कार अनन्यभावाने केला पाहिजे. इतर नाना साधनांचे कष्ट करून कशाला शिणावे ? (२३)

साधक भावें नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली ।
सुगम पंथे ने‍ऊन घाली । जेथील तेथें ॥ २४॥
साधकाने अनन्यभावाने नमस्कार केला की त्याची काळजी त्या साफ लागते आणि मग तो त्याला अगदी सोप्पा मार्गाने थेट भगवंतापर्यंत पोहोचवितो. (२४)

याकारणें नमस्कार श्रेष्ठ । नमस्कारें वोळती वरिष्ठ ।
येथें सांगितली पष्ट । साहावी भक्ती ॥ २५॥
म्हणून नमस्कार श्रेष्ठ साधन आहे. त्यायोगे वरिष्ठ म्हणजे भगवंत आणि सद्‌गुरू आपल्याकडे आकर्षित होतात. याप्रकारे येथे सहावी वंदनभक्ती स्पष्ट करून सांगितली आहे. (२५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
वंदनभक्तिनाम समास सहावा ॥ ६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसवादे ‘वंदनभक्तिनाम’ समास सहावा समाप्त.


समास सातवा : दास्यभक्ती
॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । साहवें भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । सातवी भक्ती ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात सहाव्या वंदनभक्तीचे वर्णन झाले. आता सावध होऊन सातवी भक्ती कोणती ते ऐकावे. (१)

सातवें भजन तें दास्य जाणावें । पडिलें कार्य तितुकें करावें ।
सदा सन्निधचि असावें । देवद्वारीं ॥ २॥
सातवे भजन ही दास्यभक्ती जाणावी. या भक्तीत जे पडेल ते देवाचे काम करावे लागते व सदासर्वदा जवळच देवद्वारी असावे लागते. (२)

देवाचें वैभव संभाळावें । न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें ।
चढतें वाढतें वाढवावें । भजन देवाचें ॥ ३॥
देवाचे वैभव आपण सांभाळावे. त्यात काही उणे पडूच देऊ नये. तसेच ते दिवसेंदिवस वाढेल असा प्रयत्न जरूर करावा. (३)

भंगलीं देवाळयें करावीं । मोडलीं सरोवरें बांधावीं ।
सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्यें ॥ ४॥
जुन्या पडक्या देवाल्यांचा जीर्णोद्धार करवा, मोडलेली सरोवरे परत चांगली बांधावी. सोपे, ओसऱ्या, धर्मशाळा ही नवीनच कार्ये हाती घ्यावी. (४)

नाना रचना जीर्ण जर्जर । त्यांचे करावे जीर्णोद्धार ।
पडिलें कार्य तें सत्वर । चालवित जावें ॥ ५॥
जी जुनी बांधकामे मोडकळीस आली असतील त्यांचे जीर्णोद्धार करावेत. जे काम पडेल ते ताबडतोब करीत जावे. (५)

गज रथ तुरंग सिंहासनें । चौकिया सिबिका सुखासनें ।
मंचक डोल्हारे विमानें । नूतनचि करावीं ॥ ६॥
हत्ती, रथ, घोडे सिंहासने, चौरंग, इतर सुखासने, मंचक, डोलारे, विमाने सर्व नवीनच करावीत. (६)

मेघडंब्रें छत्रें चामरें । सूर्यापानें निशाणें अपारें ।
नित्य नूतन अत्यादरें । सांभाळित जावीं ॥ ७॥
मेघडक्या, छत्रे, चामरे अबदागिऱ्या, अपार निशाणे, नित्य नूतन वाटतील अशी अत्यंत आदराने सांभाळीत जावे. र्भ ७१ नाना प्रकारची वाहने, बसण्यासाठी उत्तम जागा, अनेक प्रकारची सोन्याची आसने वगैरे प्रयलपूर्वक करत जावी. (८)

नाना प्रकारीचीं यानें । बैसावयाचीं उत्तम स्थानें ।
बहुविध सुवर्णासनें । येत्नें करीत जावीं ॥ ८॥
घरे कोठड्या, पेट्या, पेयरे रांजण, कोहळी दुव्या भोपळा वगैरे कोरून त्यात द्रव्य भरण्याची केलेली भांडी)

भुवनें कोठड्या पेट्या मांदुसा । रांझण कोहळीं घागरी बहुवसा ।
संपूर्ण द्रव्यांश ऐसा । अति येत्नें करावा ॥ ९॥
अनेक घागरी, अशा मूल्यवान वस्तू देवासाठी अत्यंत प्रयलपूर्वक कराव्यात. (९)

भुयेरीं तळघरें आणी विवरें । नाना स्थळें गुप्त द्वारें ।
अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें । येत्नें करीत जावीं ॥ १०॥
अनेक ठिकाणी भुयारे, तळघरे आणि बोगदे, नाना ठिकाणी गुप्तद्वारे यांची योजना करून मूल्यवान वस्तूंची भांडारे प्रयत्नपूर्वक करावी. (१०)

आळंकार भूषणें दिव्यांबरें । नाना रत्नें मनोहरें ।
नाना धातु सुवर्णपात्रें । येत्नें करीत जावीं ॥ ११॥
देवासाठी दागिने, भूषणे, अत्यंत दिव्य मौल्यवान वस्त्रे, नाना मनोहर रखे, नाना धातूंची आणि सोन्याचीही पात्रे भांडी खटपटीने मिळवावी. (११)

पुष्पवाटिका नाना वनें । नाना तरुवरांचीं बनें ।
पावतीं करावीं जीवनें । तया वृक्षांसी ॥ १२॥
देवासाठी पुष्पवाटिका, नाना वने, निरनिराळ्या वृक्षांच्या बागा वगैरे त्या त्या वृक्षांना पाणी देण्याची व्यवस्था करून फळतील फुलतील असे पाहावे. (१२)

नाना पशूंचिया शाळा । नाना पक्षी चित्रशाळा ।
नाना वाद्यें नाट्यशाळा । गुणी गायेक बहुसाल ॥ १३॥
निरनिराळ्या पशूसाठी तबेले, पागा, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह (चित्रशाळा), नाना वाद्ये, नाट्यशाळा व पुष्कळ गुणी गायक, ‘ (१३)

स्वयंपाकगृहें भोजनशाळा । सामग्रीगृहें धर्मशाळा ।
निद्रिस्तांकारणें पडशाळा । विशाळ स्थळें ॥ १४॥
स्वयंपाकघरे, भोजनालये, कोठारे, धर्मशाळा, झोपण्यासाठी ओवऱ्या, प्रशस्त मोठमोठ्या बांधाव्यात. (१४)

नाना परिमळद्रव्यांचीं स्थळें । नाना खाद्यफळांचीं स्थळें ।
नाना रसांचीं नाना स्थळें । येत्नें करीत जावीं ॥ १५॥
अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तू ठेवण्यासाठी जागा, नाना खाद्य पदार्थ साठवून ठेवण्यासाठी स्थळे, नाना पातळ पदार्थ साठवून ठेवण्याची व्यवस्था प्रयत्नपूर्वक करावी. (१५)

नाना वस्तांची नाना स्थानें । भंगलीं करावीं नूतनें ।
देवाचें वैभव वचनें । किती म्हणौनि बोलावें ॥ १६॥
नाना वस्तूंचा संग्रह करण्यासाठी असलेली स्थळे, मोडकळीस आली असतील, तर ती नवीन करून घ्यावीत. देवाचे वैभव शब्दांनी किती वर्णन करावे ? (१६)

सर्वां ठाई अतिसादर । आणी दास्यत्वासहि तत्पर ।
कार्यभागाचा विसर । पडणार नाहीं ॥ १७॥
सर्वांशी अतिआदरपूर्वक वागावे. पडेल ते काम करण्याविषयी तत्पर असावे. पण देवालयाच्या कार्याचा विसर पडू देऊ नये. (१७)

जयंत्या पर्वें मोहोत्साव । असंभाव्य चालवी वैभव ।
जें देखतां स्वर्गींचे देव । तटस्त होती ॥ १८॥
जयंत्या, पर्वकाल, महोत्सव अशा असंभाव्य थाटाने करावे की, ते पाहून स्वर्गातील देवांनीही तटस्थ व्हावे. (१८)

ऐसें वैभव चालवावें । आणी नीच दास्यत्वहि करावें ।
पडिले प्रसंगीं सावध असावें । सर्वकाळ ॥ १९॥
असे देवांचे वैभव वाढवावे आणि हलक्यांत हलके कामही तत्परतेने करावे. वेळप्रसंगी जे काम पडेल ते करण्याविषयी सदासर्वकाळ तत्पर असावे. (१९)

जें जें कांहीं पाहिजे । तें तें तत्काळचि देजे ।
अत्यंत आवडीं कीजे । सकळ सेवा ॥ २०॥
देवाच्या सेवेसाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या त्या तत्काळ पुरवाव्यात. अत्यंत आवडीने सर्व सेवा करावी. (२०)

चरणक्षाळळें स्नानें आच्मनें । गंधाक्षतें वसनें भूषणें ।
आसनें जीवनें नाना सुमनें । धूप दीप नैवेद्य ॥ २१॥
पाय धुणे, खान, आचमन, गंधाक्षता, वस्त्रे, भूषणे, आसने, घ्यावयाचे पाणी, निरनिराळ्या प्रकारची फुले, धूप- दीप, नैवेद्य इत्यादींची व्यवस्था करावी. (२१)

शयेनाकारणें उत्तम स्थळें । जळें ठेवावीं सुसीतळें ।
तांबोल गायनें रसाळें । रागरंगें करावीं ॥ २२॥
शयन करण्यासाठी उत्तम शेजघरे गार पिण्याचे पाणी, तांबूल यांची व्यवस्था करावी. रसाळ गायनाने उत्सवात रंग भरावा. (२२)

परिमळद्रव्यें आणी फुलीलीं । नाना सुगंधेल तेलें ।
खाद्य फळें बहुसालें । सन्निधचि असावीं ॥ २३॥
सुवासिक द्रव्ये आणि अत्तरे, नाना सुगंधी तेले, खाद्यपदार्थ, नाना प्रकारची फळे हाताशीच ठेवावीत. (२३)

सडे संमार्जनें करावीं । उदकपात्रें उदकें भरावीं ।
वसनें प्रक्षालून आणावीं । उत्तमोत्तमें ॥ २४॥
सडासंमार्जन करावे, पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावी. उत्तमोत्तम वस्त्रे स्वच्छ धुऊन आणावी. (२४)

सकळांचें करावें पारपत्य । आलयाचें करावें आतित्य ।
ऐसी हे जाणावी सत्य । सातवी भक्ती ॥ २५॥
सगळ्यांचा आदरसत्कार करावा, जे जे कुणी येईल त्याचा पाहुणचार करावा. अशा प्रकारे सेवा करणे ही सातवी भक्ती आहे. (२५)

वचनें बोलावीं करुणेचीं । नाना प्रकारें स्तुतीचीं ।
अंतरें निवतीं सकळांचीं । ऐसें वदावें ॥ २६॥
सर्वांशी नसतेने बोलावे. सर्वांची गोड बोलून स्तुती करावी. सर्वांच्या अंतःकरणास सुख होईल, असे बोलावे. (२६)

ऐसी हे सातवी भक्ती । निरोपिली येथामती ।
प्रत्यक्ष न घडे तरी चित्तीं । मानसपूजा करावी ॥ २७॥
या प्रकारे यथामती येथे सातव्या भक्तीचे वर्णन केले आहे. हे सर्व दास्य, ही सर्व सेवा प्रत्यक्ष घडत असेल तर उत्तमच; पण प्रत्यक्ष घडत नसेल तर मनात तरी करावी. (२७)

ऐसें दास्य करावें देवाचें । येणेंचि प्रकारें सद्गुbरूचें ।
प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें । करित जावें ॥ २८॥
याप्रकारे देवाचे दास्य करावे व तसेच सद्‌गुरूचेही करावे. प्रत्यक्ष घडत नसेल तर निदान मानसपूजेत तरी ते जरूर करावे. (२८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
दास्यभक्तिनाम समास सातवा ॥ ७॥
इति श्रीदासबोथे गुरूशिष्यसंवादे ‘दास्यभक्तिनाम’ समास सातवा समाप्त.


समास आठवा : सख्यभक्तिनिरूपण
॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । सातवे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात सातव्या भक्तीचे लक्षण वर्णन केले आता सावध होऊन आठवी भक्ती कशी असते ते ऐका. (१)

देवासी परम सख्य करावें । प्रेम प्रीतीनें बांधावें ।
आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २॥
देवाशी परम सख्य करावे. त्याला प्रेमाने बांधून ठेवावे हे आठव्या भक्तीचे लक्षण आहे. (२)

देवास जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावें तेणें रीतीं ।
येणें करितां भगवंतीं । सख्य घडे नेमस्त ॥ ३॥
देवाला ज्या गोष्टीबद्दल अत्यंत प्रीती असेल त्याच गोष्टी आपण कण्य्या, त्याला आवडेल असेच आपण वागावे; असे केल्याने निश्चितपणे भगवंताशी सख्य घडते. (३)

भक्ति भाव आणी भजन । निरूपण आणी कथाकीर्तन ।
प्रेमळ भक्तांचें गायन । आवडे देवा ॥ ४॥
भक्ती, भाव आणि भजन तसेच अध्यात्माचे निरूपण व कथा-कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन हे सर्व देवाला आवडते. (४)

आपण तैसेंचि वर्तावें । आपणासि तेंच आवडावें ।
मनासारिखें होतां स्वभावें । सख्य घडे नेमस्त ॥ ५॥
देवाला आवडेल असेच आपण वागावे. त्याला जे आवडते तेच आपल्यालाही आवडावे. असे आपण त्याच्या मनासारखे वागू लागलो म्हणजे साहाजिकच निश्चितपणे सख्य होते. (५)

देवाच्या सख्यत्वाकारणें । आपलें सौख्य सोडून देणें ।
अनन्यभावें जीवें प्राणें । शरीर तेंहि वेंचावें ॥ ६॥
देवाचे सख्य घडावे अशी मनापासून तळमळ असेल तर आपल्या सुखाचा विचार आपण सोडून दिला पाहिजे, अनन्यभावाने जीव, प्राण एवढेच नव्हे, तर हे शरीरही त्याच्या चरणी समर्पण करावे. (६)

सांडून आपली संसारवेथा । करित जावी देवाची चिंता ।
निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचि सांगाव्या ॥ ७॥
आपल्या प्रपंचाची काळजी करणे सोडून द्यावे व भगवंताचेच चिंतन करावे. देवांच्याच निर्गुण स्वरूपाचे निरूपण करावे, सगुणाच्या कथा, वार्ता सांगाव्या. (७)

देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी ।
सर्व अर्पावें, सेवटीं- । प्राण तोहि वेचावा ॥ ८॥
देवाशी सख्य व्हावे अशी खरीच तळमळ असेल तर वेळप्रसंगी सर्व सुहृदांचा त्याग करावा लागला तरी त्याची तयारी असायला हवी. भगवंताच्या चरणी सर्वस्व अर्पावे; एवढेच नव्हे तर आपला प्राणही त्याच्या चरणी समर्पण करण्याची तयारी असावी. (८)

आपुलें आवघेंचि जावें । परी देवासी सख्य राहावें ।
ऐसी प्रीती जिवें भावें । भगवंतीं लागावी ॥ ९॥
आपले सर्व काही गेले तरी चालेल, पण भगवंताशी सख्य मात्र कायम टिकून सहिलेपाहिजे, अशी जीवाभावाची प्रीती भगवंताविषयी उत्पन्न होणे आवश्यक आहे. (९)

देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासी न करावें निर्वाण ।
परम प्रीतीचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १०॥
देव म्हणजे जणू आपला प्राण ! त्याच्या वियोगाची कल्पनाही आपणास सहन होता कामा नये, अशी अत्यंत उत्कट प्रीती त्याच्या ठिकाणी उत्पन व्हायला हवी. ह्यालाच परम प्रेम म्हणतात. (१०)

ऐसें परम सख्य धरितां । देवास लागे भक्ताची चिंता ।
पांडव लाखाजोहरीं जळतां । विवरद्वारें काढिले ॥ ११॥
असे परम सख्य जडले की त्या भक्ताची चिंता भगवंतास लागते. पांडवांचे असे परम सख्य होते, म्हणूनच ते लाक्षागृहात जळून जाण्याचा प्रसंग आला असता भगवंतांनी भुयाराच्या मार्गाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. (११)

देव सख्यत्वें राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासी ।
आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येती पडसादें ॥ १२॥
देवाने आपल्याशी सख्यत्वाने राहावे, अशी इच्छा असेल तर त्याचे रहस्य आपल्यापाशीच आहे. आपण जे शब्द ज्या प्रकारे बोलतो, त्याचा प्रतिध्वनी त्याच प्रकारे आपल्याला ऐकू येतो. (१२)

आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे ।
आपण त्रास घेतां जीवें । देवहि त्रासे ॥ १३॥
आपला भाव जर अनन्य असेल तर देवही आपल्याला तो तत्काळ पावतो. पण आपल्याला त्याचा त्रास वाटत असेल, तर देवही त्रासतो. (१३)

श्लोक ॥ ये यथा मां प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहम् ।
अर्थ-जे लोक ज्याप्रकारे मला भजतात. त्यांना मी त्याच प्रकारे भजतो.

जैसें जयाचे भजन । तैसाचि देवहि आपण ।
म्हणौन हें आवघें जाण । आपणाचि पासीं ॥ १४॥
ज्याचे भजन ज्या प्रकारचे असेल, त्याप्रमाणे देव त्याला तसाच प्रतिसाद देतो. म्हणून हेसर्व आपल्या भावनेवरच अवलंबून असते. (१४)

आपुल्या मनासारिखें न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे ।
तरी गोष्टी आपणांकडे । सहजचि आली ॥ १५॥
आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही, तर त्यामुळे भगवंतावरील निष्ठा जर ढळत असेल तर सहजच दोष आपलाच आहे हे जाणून घ्यावे. (१५)

मेघ चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना ।
चंद्र वेळेसि उगवेना । तर्ह्ही चकोर अनन्य ॥ १६॥
एखादे वेळी मेघाने कृपा करून वृष्टी केली नाही तरी चातकाचे मन पालटत नाही. चंद्र वेळेवर उगवला नाही, तरी चकोराचे त्याच्या ठिकाणी जे अनन्य प्रेम असते, ते रतिभरही कमी होत नाही. भगवंतावर आपले असे अनन्य प्रेम असणे आवश्यक आहे. (१६)

ऐसें असावें सख्यत्व । विवेकें धरावें सत्व ।
भगवंतावरील ममत्व । सांडूंचि नये ॥ १७॥
सख्यत्व असावे तर असे असावे. कुठल्याही प्रसंगी विवेककरून धैर्य धारण करावे. भगवंतावरील प्रेम कुठल्याही प्रसंगांत ढळू देऊ नये. (१७)

सखा मानावा भगवंत । माता पिता गण गोत ।
विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा ॥ १८॥
भगवंतास आपलसखा मानावा. एवढेच नव्हेतर आपले माता, पिता, आसस्वकीय, विद्या, लक्ष्मी, धन, वित्त इत्यादी सर्व काही भगवंतच आहे, अशी दृढ भावना असावी. (१८)

देवावेगळें कोणीं नाहीं । ऐसें बोलती सर्वहि ।
परंतु त्यांची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९॥
सर्व लोक तोंडाने बोक्याना म्हणतात की, देवाशिवाय माझेकोणीच नाही, परंतुत्यांची तशी दृढनिछ मात्र नसते. (१९)

म्हणौनी ऐसें न करावें । सख्य तरी खरेंचि करावें ।
अंतरीं सदृढ धरावें । परमेश्वरासी ॥ २०॥
म्हणून आपण मात्र असे करू नये. देवाशी सख्य करावयाचे ते अंतःकरणापासून करावे. आपण आपल्या अंतःकरणात भगवंताला अगदी दृढपणे धरून ठेवावे. (२०)

आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोधास येणें ।
ऐसीं नव्हेत किं लक्षणें । सख्यभक्तीचीं ॥ २१॥
जय आपल्या मनासारखे काही घडलेनाही की, देवावर क्रोध करायचा, हे काही सख्यभक्तीचे लक्षण नाही. (२१)

देवाचें जें मनोगत । तेंचि आपुलें उचित ।
इच्छेसाठीं भगवंत । अंतरूं नये कीं ॥ २२॥
देवाच्या इच्छेने जे जे घडते, ते आपल्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच असते अशी दृढ निष्ठा असावी. आपली इच्छा पूर्ण झाली नाही, या शुल्लक कारणावरून देवावरील प्रेमात अंतर पडू देऊ नये. (२२)

देवाचे इच्छेनें वर्तावें । देव करील तें मानावें ।
मग सहजचि स्वभावें । कृपाळु देव ॥ २३॥
देवाच्या इच्छेप्रमाणे वागावे. देव जे जे करील ते मनःपूर्वक समाधानाने मान्य करावे. असे केले असता देव सहजच कृपाळू स्वभावाचा असल्याने प्रसन्न होऊन कृपेचा वर्षाव करतो. (२३)

पाहातां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायेसी ।
माता वधी बाळकासी । विपत्तिकाळीं ॥ २४॥
देवाची कृपा पाहता मातेची कृपा अगदी शुल्लक आहे. संकटकाळ आला असता, आई स्वार्थासाठी स्वतःच्या बालकाचाही वध करते. (२४)

देवें भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना ऐकिला ।
शरणागतांस देव जाला । वज्रपंजरु ॥ २५॥
पण देवाने कुठल्या भक्ताचा कधी वध केला आहे, असे कधी ऐकण्यात किंवा पाहण्यातही नाही. उलट शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी देव वजाच्या पिंजऱ्यासारखा बनतो. (२५)

देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसि तारी ।
देव होये साहाकारी । अनाथांचा ॥ २६॥
देव हा भक्तांचा कैवारी आहे. तो पतितांचा उद्धार करतो. दीन दुबळ्यांना, अनाथांना तो साहाय्य करतो. (२६)

देव अनाथांचा कैपक्षी । नाना संकटांपासून रक्षी ।
धांविन्नला अंतरसाक्षी । गजेंद्राकारणें ॥ २७॥
देव अनाथांचा कैवारी असून त्यांचे नाना संकयंतून रक्षण करतो. तो अंतरसाक्षी असल्याने हृदयातील भाव तत्काळ जाणतो. म्हणूनच त्याने गजेंद्राचा धावा ऐकून तत्काळ तेथे धाव घेतली व त्याची मुक्तता केली. (२७)

देव कृपेचा सागरु । देव करुणेचा जळधरु ।
देवासि भक्तांचा विसरु । पडणार नाहीं ॥ २८॥
देव हा कृपेचा सागर आहे. करुणेचा मेघ आहे. त्याला आपल्या भक्तांचा कधीच विसर पडत नाही. (२८)

देव प्रीती राखों जाणे । देवासी करावें साजणें ।
जिवलगें आवघीं पिसुणें । कामा न येती ॥ २९॥
प्रीतीचे रक्षण कसे करावे, हे फक्त देवच जाणतो, म्हणून देवाशीच सख्य करावे. ज्यांना आपण जिवलग समजतो, ते सर्व देहाचे संबंधी आसस्वकीय स्वार्थी असतात. आपल्या संकयचे वेळी ते कुणी उपयोगी पडू शकत नाहीत. (२९)

सख्य देवाचें तुटीना । प्रीति देवाची विटेना ।
देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३०॥
एकदा देवाशी सख्य जोडले की ते कधी तुटत नाही, कारण देवाचे प्रेम कमी होत नाही. जे देवास शरण जातात, त्यांचा देव कधीही त्याग करीत नाही. (३०)

म्हणौनि सख्य देवासी करावें । हितगुज तयासी सांगावें ।
आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३१॥
म्हणून सख्य देवाशीच करावे. आपल्या मनातील गुप्त गोष्टी देवापाशीच सांगाव्या. आठव्या भक्तीचे लक्षण हे असे आहे. (३१)

जैसा देव तैसा गुरु । शास्त्रीं बोलिला हा विचारु ।
म्हणौन सख्यत्वाचा प्रकारु । सद्गुारूसीं असावा ॥ ३२॥
जसा देव तसाच सद्‌गुरू असे शास्त्रांत सांगून ठेवले आहे. म्हणून ज्याप्रमाणे भगवंताशी सख्य जोडावे तसेच सद्‌गुरूशी सख्य जोडणे आवश्यक आहे. (३२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सख्यभक्तिनाम समास आठवा ॥ ८॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंबादे ‘सख्यभक्तिनाम’ समास आठवा समाप्त.


समास नववा : आत्मनिवेदनभक्ती
॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । आठवे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । भक्ति नवमी ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात आठव्या भक्तीचे निरूपण केले. आता सावध होऊन नववी भक्ती कोणती, ते ऐका. (१)

नवमी निवेदन जाणावें । आत्मनिवेदन करावें ।
तेंहि सांगिजेल स्वभावें । प्रांजळ करूनि ॥ २॥
नवव्या भक्तीला निवेदनभक्ती म्हणतात. यात आत्मनिवेदन करावयाचे असते. तेही कसे करावे, हे स्वाभाविक रीतीने स्पष्ट करून सांगतो. (२)

ऐका निवेदनाचें लक्षण । देवाअसि वाहावें आपण ।
करावें तत्त्वविवरण । म्हणिजे कळे ॥ ३॥
निवेदनाचे लक्षण असे आहे. यात आपण स्वतःला देवास समर्पण करावे. ते कसे करावयाचे ते तत्त्वविवेचनाने कळते. (३)

मी भक्त ऐसें म्हणावें । आणी विभक्तपणेंचि भजावें ।
हें आवघेंचि जाणावें । विलक्षण ॥ ४॥
मी भक्त असे म्हणायचे आणि विभक्तपणे देवाला भजायचे हे सर्वच अयोग्य आहे. (४)

लक्षण असोन विलक्षण । ज्ञान असोन अज्ञान ।
भक्त असोन विभक्तपण । तें हें ऐसें ॥ ५॥
लक्षण असून लक्षणहीन म्हणावे. ज्ञान असून अज्ञान आहे असे म्हणणे आणि भक्त असून विभक्तपणे राहाणे हे सर्वच काही विलक्षण व विपरीत आहे. (५)

भक्त म्हणिजे विभक्त नव्हे । आणी विभक्त म्हणिजे भक्त नव्हे ।
विचारेंविण कांहींच नव्हे । समाधान ॥ ६॥
जो विभक्त नाही, त्यालाच भक्त म्हणता येईल. आणि जो विभक्त आहे तो भक्त असू शकत नाही. या विरोधाभासाचे समाधान विचाराशिवाय होणार नाही. (६)

तस्मात् विचार करावा । देव कोण तो वोळखावा ।
आपला आपण शोध घ्यावा । अंतर्यामीं ॥ ७॥
म्हणून साधकाने विचार करावा, देव कोणाला म्हणायचे ते ओळखावे व ‘ मी कोण ‘ असा आपला आपणही अंतर्मुख वृत्ती करून अंतःकरणात शोध घ्यावा. (७)

मी कोण ऐसा निवाडा । पाहों जातां तत्वझाडा ।
विचार करितां उघडा । आपण नाहीं ॥ ८॥
‘मी कोण ?’ याचा निवाडा करू लागल्यावर एकेका तत्त्वाचा निरास करीत गेले की, शेवटी प्रकृतीचाही निरास होतो आणि मग ‘ मी ‘ म्हणून कुणी उरतच नाही. ज्याला आपण ‘ मी म्हणतो ‘ त्याचे अस्तित्वच नाही, हे विवेकाने कळून येते. (८)

तत्वें तत्व जेव्हां सरे । तेव्हां आपण कैंचा उरे ।
आत्मनिवेदन येणेंप्रकारें । सहजचि जालें ॥ ९॥
जे तत्त्व ज्यातून झाले त्यात त्याचा विवेकाने लय करीत गेले की सर्वच प्रकृतीचा निरास होतो म्हणजे मूळ मायाही उरत नाही. मग मी म्हणणाराही उरत नाही. केवळ एकमेव सच्चिदानंदस्वरूपच उरते. हे जेव्हा कळून येते तेव्हा सहजच ‘ आत्मनिवेदन ‘ होते. (९)

तत्वरूप सकळ भासे । विवेक पाहातां निरसे ।
प्रकृतिनिरासें आत्मा असे । आपण कैंचा ॥ १०॥
जे दृश्य विश्व आहे ते पांचभौतिक आहे, याचा विवेक करून एकेका तत्त्वाचा निरास करीत गेले की, शेवटी प्रकृतोचाही निरास होतो व फक्त आत्मा शिल्लक राहतो व मग आपण म्हणजे आत्मा हे कळून येते. (१०)

येक मुख्य परमेश्वरु । दुसरी प्रकृति जगदाकारु ।
तिसरा आपण कैंचा चोरु । आणिला मधें ॥ ११॥
मुख्य तत्त्वे दोन मानली तर एक म्हणजे परमेश्वर म्हणजे शिव, दुसरी जगाच्या रूपाने भासणारी प्रकृती. ही दोनच मूल तत्त्वे असताना त्यात ‘ मी ‘ हा तिसरा चोर कोल आणला ? (११)

ऐसें हें सिद्धचि असतां । नाथिली लागे देहाहंता ।
परंतु विचारें पाहों जातां । कांहींच नसे ॥ १२॥
याप्रमाणे विचाराने हे सर्व सिद्ध झाले असता लटकी ‘ मी देह ही बुद्धी ‘ उगीच मागे लागली आहे; पण तत्त्वविचार केल्यावर ‘ मी ‘ चे अस्तित्वच राहात नाही. (१२)

पाहातां तत्त्वविवेचना । पिंडब्रह्मांडतत्वरचना ।
विश्वाकारें वेक्ती, नाना- । तत्वें विस्तारलीं ॥ १३॥
तत्त्वविवेचन करू लागल्यावर एका तत्त्वातून दुसरे तत्त्व कसे झाले हे कळते व पिंड-ब्रह्मांड रचना कशी झाली व विश्वाकार नाना व्यक्ती, यांच्या रूपाने नाना तत्त्वे म्हणजे पंचमहाभूतादीच कशी विस्तार पावली आहेत, हे कळून येते. (१३)

तत्वें साक्षत्वें वोसरतीं । साक्षत्व नुरे आत्मप्रचिती ।
आत्मा असे आदि‍अंतीं । आपण कैंचा ॥ १४॥
याप्रमाणे विवेक करू लागल्यावर आपण तत्त्वांहून भिन्न साक्षी आहोत हे कळते. ही जाणीव झाली की तत्त्वे ओसरतात. पुढे जेव्हा आत्मानुभव, आत्मप्रचीती येते, तेव्हा एकमेव सच्चिदानंद स्वरूपाशिवाय दुसरे साक्षित्वही उरत नाही. आदि- अंती फक्त एक आत्माच आहे, हे कळल्यावर ‘ मी ‘ शिल्लकच राहात नाही. (१४)

आत्मा एक स्वानंदघन । आणी अहमात्मा हें वचन ।
तरी मग आपण कैंचा भिन्न । उरला तेथें ॥ १५॥
एक आत्याच स्वानदघन असून ‘ अहमात्मा ‘ म्हणजेच मी तो आत्माच आहे, असा अनुभव आल्यावर तेथे आपण म्हणून भिन्न कुणी कसा उरेल ? (१५)

सोहं हंसा हें उत्तर । याचें पाहावें अर्थांतर ।
पाहतां आत्मयाचा विचार । आपण कैंचा तेथें ॥ १६॥
‘सोहं हंसा ‘ हे ‘ मी कोण ‘ या प्रश्नाचे उत्तर आहे. याच्या अर्थाचा सखोल विचारकेल्यावर आणि आल्यासंबंधी विचार केल्यावर कळून येते की जेथे आत्य्याशिवाय अन्य काही नाहीच, तेथे आपण, आपले अस्तित्वच कुठे शिल्लक राहते ? (१६)

आत्मा निर्गुण निरंजन । तयासी असावें अनन्य ।
अनन्य म्हणिजे नाहीं अन्य । आपण कैंचा तेथें ॥ १७ ॥
आत्मा निर्गुण निरंजन आहे. त्याच्याशी अनन्य असावे. याचा अर्थच असा होतो की तेथे अन्य म्हणजे दुसरा कुणी नाहीच. मग तेथे आपण म्हणजे ‘ मी ‘ राहातोच कोठे ओ(१७)

आत्मा म्हणिजे तो अद्वैत । जेथें नाहीं द्वैताद्वैत ।
तेथें मीपणाचा हेत । उरेल कैंचा ॥ १८॥
आत्मस्वरूपात द्वैत तर नाहीच पण अद्वैतही उरत नाही. जेथे द्वैताद्वैतही नाही, तेथे ज्याला एकत्व किंवा भिन्नत्व भासते, तो ‘ मी ‘ च तेथे उरत नाही. (१८)

आत्मा पूर्णत्वें परिपूर्ण । जेथें नाहीं गुणागुण ।
निखळ निर्गुणी आपण । कोण कैंचा ॥ १९॥
आत्मा हा पूर्णत्वाने परिपूर्ण असतो. तेथे गुण, अगुण दोन्हींचा अभाव असतो. तो निखळ निर्गुण असतो. सर्वत्र एक आत्याच परिपूर्ण असून येथे दुसरे काही नसतेच, तर अशा परिस्थितीत आपण म्हणजे मी म्हणणारा तेथे असेलच कसा ? (१९)

त्वंपद तत्पद असिपद । निरसुनि सकळ भेदाभेद ।
वस्तु ठाईंची अभेद । आपण कैंचा ॥ २०॥
‘त्वंपद ‘ म्हणजे तू ‘ तत्पद ‘ म्हणजे ते ब्रह्म आणि ‘ असि ‘ पद म्हणजे आहेस. ‘ तू ते ब्रह्म आहेस ‘ याप्रमाणे निदिध्यासन करता करता निदिध्यासन करणातच जेव्हा ब्रह्मरूप होऊन जातो, तेव्हा सगळे भेद व अभेदाचेही निरसन होते व एक आत्मवस्तूच राहते. तेथे ‘ मी ‘ चे अस्तित्वच कसे राहील ? (२०)

निरसितां जीवशिवौपाधी । जीवशिवचि कैंचे आधी ।
स्वरूपीं होतां दृढबुद्धि । आपण कैंचा ॥ २१॥
एका परब्रह्माशिवाय अन्य वस्तूच नाही. विद्या या उपाधीमुळे त्यालाच ‘ शिव ‘ संज्ञा प्रास होते, तर अविद्या उपाधीमुळे ‘ जीव ‘ संज्ञा प्रास होते, दोन्ही उपाधीचे निरसन केल्यावर जीवशिवच राहात नाहीत. केवळ एकच एक ब्रह्मच राहते व तेच सर्वांचे स्वरूप आहे. याप्रमाणे आपल्या स्वरूपाविषयीचे ज्ञान दृढ झाले म्हणजे ‘ आपण ‘ म्हणजे ‘ मी ‘ म्हणून कुणी राहात नाही. (२१)

आपण मिथ्या, साच देव । देव भक्त अनन्यभाव ।
या वचनाचा अभिप्राव । अनुभवी जाणती ॥ २२॥
म्हणून आपण ज्याला ‘ मी ‘ म्हणतो, तो देहाभिमानी मिथ्या ठरतो आणि देव म्हणजे पूर्णत्वाने परिपूर्ण आत्माच केवळ सत्य आहे हे कळून येते. म्हणजे देव व भक्त म्हणजे शिव व जीव तत्त्वतः एकच परब्रह्मरूपी आहेत, असा अनुभव ज्यांना साक्षात होतो, तेच या वचनांचा अभिप्राय जाणतात. (२२)

या नांव आत्मनिवेदन । ज्ञानियांचें समाधान ।
नवमे भक्तींचे लक्षण । निरोपिलें ॥ २३॥
या स्वात्मानुभवालाच आत्मनिवेदन म्हणतात. यायोगे ज्ञानी लोकांना समाधान प्रास होते. याप्रमाणे येथे नवव्या ‘ आत्मनिवेदन ‘ भक्तीचे लक्षण सांगितले आहे. (२३)

पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमधें जगदीश ।
नवविधा भक्तीमध्यें विशेष । भक्ति नवमी ॥ २४॥
पंचमहाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ. सर्व देवांमध्ये जगदीश श्रेष्ठ त्याप्रमाणे नवविधा भक्तींमध्ये ही नववी भक्ती श्रेष्ठ आहे. (२४)

नवमी भक्ती आत्मनिवेदन । न होतां न चुके जन्ममरण ।
हें वचन सत्य, प्रमाण- । अन्यथा नव्हे ॥ २५॥
जोपर्यंत ही नववी आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच स्वात्मानुभव प्रास होत नाही, तोपर्यंत जन्ममरणांतून सुटका होऊ शकत नाही. श्रीसमर्थ म्हणतात की, माझे हे वचन सत्य, प्रमाण मानावे. हे खोटे मानू नये. (२५)

ऐसी हे नवविधा भक्ती । केल्यां पाविजे सायोज्यमुक्ती ।
सायोज्यमुक्तीस कल्पांतीं । चळण नाहीं ॥ २६॥
अशा प्रकारे नवविधाभक्ती केली असता सायुज्य मुक्ती प्रास होते. एकदा सायुज्यमुक्ती प्रास झाली की, ती कल्पांतीही नष्ट होत नाही. (२६)

तिहीं मुक्तींस आहे चळण । सायोज्यमुक्ती अचळ जाण ।
त्रैलोक्यास होतां निर्वाण । सायोज्यमुक्ती चळेना ॥ २७॥
एकंदर मुक्ती चार आहेत. त्यांतील पहिल्या तिन्ही मुक्तींचा नाश होतो. पण सायुज्यमुक्ती मात्र अविनाशी आहे. त्रैलोक्याचा नाश झाला तरी सायुज्यमुक्तीचा नाश होत नाही. (२७)

आवघीया चत्वार मुक्ती । वेदशास्त्रें बोलती ।
तयांमध्यें तीन नासती । चौथी ते अविनाश ॥ २८॥
वेदशास्त्रांनी एकूण चार मुक्ती वर्णन केल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या तीन नाश पावतात. पण चौथी मुक्ती सायुज्यता ही अविनाशी आहे. (२८)

पहिली मुक्ती ते स्वलोकता । दुसरी ते समीपता ।
तिसरी ते स्वरूपता । चौथी सायोज्यमुक्ती ॥ २९॥
सलोकता ही पहिली मुक्ती होय. समीपता ही दुसरी मुक्ती असून स्वरूपता ही तिसरी मुक्ती आहे, तर सायुज्यमुक्ती ही चौथी मुक्ती होय. (२९)

ऐसिया चत्वार मुक्ती । भगवद्भजनें प्राणी पावती ।
हेंचि निरूपण प्रांजळ श्रोतीं । सावध पुढें परिसावें ॥ ३०॥
भगवद्‌भजनाने या चार मुक्ती साधकांना प्रास होतात. या चारी मुक्तींचे प्रांजळ वर्णन पुढल्या समासात करीत आहे. ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आत्मनिवेदनभक्तिनाम समास नववा ॥ ९॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसवादे ‘आत्मनिवेदनभक्तिनाम’ समास नववा समाप्त.


समास दहावा : मुक्तिचतुष्टय
॥ श्रीराम ॥

मुळीं ब्रह्म निराकार । तेथें स्फूर्तिरूप अहंकार ।
तो पंचभूतांचा विचार । ज्ञानदशकीं बोलिला ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात, मुळात ब्रह्म निराकार आहे. तेथे ‘ बहु स्थाम्’ हे मूळ स्कृरण उत्पन्न झाले. हाच अहंकार होय. यातूनच पुढे पंचमहाभूते निर्माण झाली. यासंबंधीचा विचार ज्ञानदशकात सांगितला आहे. (१)

तो अहंकार वायोरूप । तयावरी तेजाचें स्वरूप ।
तया तेजाच्या आधारें आप । आवर्णोदक दाटलें ॥ २॥
तया आवर्णोदकाच्या आधारें । धरा धरिली फणिवरें ।
वरती छपन्न कोटी विस्तारें । वसुंधरा हे ॥ ३॥
तो अहंकार वायुरूप असतो. त्यातून तेजतत्त्वाचे स्वरूप प्रगटते. त्या तेजाच्या आधाराने आप म्हणजे जलतत्त्व व्यक्त होऊन ते पाण्याच्या, समुद्राच्या रूपाने सर्वत्र भरून राहाते. त्या समुद्राच्या आधाराने शेषाने पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली आहे. पृथ्वीचा विस्तार छप्पन कोटी योजनेइतका आहे. (२ – ३)

इयेवरी परिघ सप्त सागर । मध्य मेरू माहां थोर ।
अष्ट दिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिला ॥ ४॥
तिच्याभोवती सात सागरांचा वेढा असून मध्ये महाथोर असा मेरू पर्वत आहे. अष्ट दिक्यालांचा परिवार या अंतराला वेढून त्याचे रक्षण करतो. (४)

तो सुवर्णाचा माहा मेरू । पृथ्वीस तयाचा आधारु ।
चौरुआसी सहस्र विस्तारु । रुंदी तयाची ॥ ५॥
महामेरू पर्वत सुवर्णाचा असून पृथ्वीला त्याचाच आधार आहे. त्याची रुंदी चौऱ्याऐंशी सहस्त्र योजने आहे. (५)

उंच तरी मर्यादेवेगळा । भूमीमधें सहस्र सोळा ।
तया भोवता वेष्टित पाळा । लोकालोक पर्वताचा ॥ ६ ॥
त्याच्या उंचीला तर मर्यादाच नाही. पृथ्वीच्या आत तो सोळा सहस्त्र योजने गेलेला आहे. त्याच्याभोवती लोकालोक पर्वताचा वेढा आहे. (६)

तया ऐलिकडे हिमाचळ । जेथें पांडव गळाले सकळ ।
धर्म आणी तमाळनीळ । पुढें गेले ॥ ७॥
त्याच्या अलीकडे जेथे सर्व पांडव मृत्युमुखी पडले, तो हिमाचल पर्वत आहे. फक्त धर्मराज आणि श्रीकृष्ण हे दोघेच फक्त पुढे गेले. (७)

जेथें जावया मार्ग नाहीं । मार्गी पसरले माहा अही ।
सितसुखें सुखावले ते ही । पर्वतरूप भासती ॥ ८॥
तेथे जायचा मार्ग नाही. मार्गात महाप्रचंड साप सर्वत्र पसरलेले आहेत. तेथील थंडीमुळे तेही सुखावले आहेत. ते पर्वतरूपच वाटतात. (८)

तया ऐलिकडे सेवटीं जाण । बद्रिकाश्रम बद्रिनारायण ।
तेथें माहां तापसी, निर्वाण- । देहत्यागार्थ जाती ॥ ९॥
त्यांच्याही अलीकडे अगदी शेवटी बद्रिकाश्रम बद्रिनारायण ही स्थाने आहेत. तेथे महान तपस्वी लोक निर्वाणकाळी देहत्याग करण्यासाठी जातात. (९)

तया ऐलिकडे बद्रिकेदार । पाहोन येती लहानथोर ।
ऐसा हा अवघा विस्तार । मेरुपर्वताचा ॥ १०॥
त्याच्याही अलीकडे बद्रिकेदार असून त्याच्या दर्शनासाठी लहानथोर सर्वच जातात. असा हा सर्व मेरुपर्वताचा विस्तार आहे. (१०)

तया मेरुपर्वतापाठारीं । तीन श्रृंगे विषमहारी ।
परिवारें राहिले तयावरी । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ११॥
त्या मेरुपर्वताच्या पठारावर वाकड्या रेषेत तीन पर्वतशिखरे आहेत. तेथे परिवारासह ब्रह्मा, विष्णू महेश हे तीन देव राहतात. (११)

ब्रह्मश्रृंग तो पर्वताचा । विष्णुशृंग तो मर्गजाचा ।
शिवश्रृंग तो स्फटिकाचा । कैळास नाम त्याचें ॥ १२॥
ब्रह्मसुग हा साध्या दगडाचा आहे. विण्यरुग पर्वतशिखर पाचूचे आहे तर शिवसुग हे पर्वतशिखर स्फटिकाचे असून त्याचे नाव कैलास आहे. (१२)

वैकुंठ नाम विष्णुश्रृंगाचें । सत्यलोक नाम ब्रह्मश्रृंगाचें ।
अमरावती इंद्राचें । स्थळ खालतें । १३॥
विष्यवृगाचे नाव वैकुंठ असून ब्रह्मरुंगाचे नाव सत्यलोक असे आहे. त्याच्या खालती इंद्राचे अमरावती हे स्थळ आहे. (१३)

तेथें गण गंधर्व लोकपाळ । तेतिस कोटी देव सकळ ।
चौदा लोक, सुवर्णाचळ- । वेष्टित राहिले ॥ १४॥
तेथे गण, गंधर्व, लोकपाल, तेहतीस कोटी देव आणि ससस्वर्ग व ससपाताल हे चौदा लोक त्या सुवर्णाच्या पर्वतास वेढून राहिले आहेत. (१४)

तेथें कामधेनूचीं खिलांरें । कल्पतरूचीं बनें अपारें ।
अमृताचीं सरोवरें । ठाईं ठाईं उचंबळतीं ॥ १५॥
तेथे कामधेतूंचे कळप आहेत. कल्पतरूंची अपार वने आणि अमृताची ठायी ठायी उचंबळणारी सरोवरे आहेत. (१५)

तेथें उदंड चिंतामणी । हिरे परिसांचियां खाणी ।
तेथें सुवर्णमये धरणी । लखलखायमान ॥ १६॥
तेथे असंख्य चिंतामणी आहेत. हिऱ्यांच्या व परिसाच्या खाणी आहेत व तेथील जमीन सर्व ल्यक्कणत्या सोन्याची आहे (१६)

परम रमणीये फांकती किळा । नव्वरत्नाचिया पाषाणसिळा ।
तेथें अखंड हरुषवेळा । आनंदमये ॥ १७॥
ज्याचे परम रमणीय तेज सर्वत्र फाकत आहे अशा नवरताच्या पाषाणशिळा तेथे आहेत. तेथे अखंड आनंदमय वातावरण असते. (१७)

तेथें अमृतांचीं भोजनें । दिव्य गंधें दिव्य सुमनें ।
अष्ट नायका गंधर्वगायनें । निरंतर ॥ १८॥
तेथे अमृताचे भोजन असते, दिव्य गंध, दिव्य फुले यांची लयलूट असते. तसेच अष्टनायिका व गंधर्व यांचे गायन निरंतर चालू असते. (१८)

तेथें तारुण्य वोसरेना । रोगव्याधीहि असेना ।
वृधाप्य आणी मरण येना । कदाकाळीं ॥ १९॥
तेथे तारुण्य कधी ओसरत नाही, व्याधी असत नाही आणि वृद्धपणा व मरणही कधी येतच नाही. (१९)

तेथें येकाहूनि येक सुंदर । तेथें येकाहूनि येक चतुर ।
धीर उदार आणी शूर । मर्यादेवेगळे ॥ २०॥
तेथे राहणार लोक एकापेक्षा एक सुंदर एकापेक्षा एक चतुर धीर उदार आणि अत्यंत -शूर असतात. (२०)

तेथें दिव्यदेह ज्योतिरूपें । विद्युल्यतेसारिखीं स्वरूपें ।
तेथें येश कीर्ति प्रतापें । सिमा सांडिली ॥ २१॥
तेथील रहिवाशांचे देह दिव्य ज्योतिरूप असतात. विजेप्रमाणे लखलखीत त्यांचे स्वरूप असते आणि त्यांचे यश आणि प्रताप हे असीम असतात. (२१)

ऐसें तें स्वर्गभुवन । सकळ देवांचें वस्तें स्थान ।
तयां स्थळाचें महिमान । बोलिजे तितुकें थोडें ॥ २२॥
ते स्वर्गभुवन, सर्व देवांचे वसतिस्थान असून त्या स्थळाची थोरवी वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. (२२)

येथें ज्या देवाचें भजन करावें । तेथें ते देवलोकीं राहावें ।
स्वलोकता मुक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३॥
या मृत्युलोकात असताना ज्या देवतेची उपासना माणूस करतो, त्या देवतेच्या लोकांत तो मृत्यूनंतर जाऊन सहतो. स्वलोकता मुक्तीचे लक्षण हे असे आहे. (२३)

लोकीं राहावें ते स्वलोकता । समीप असावें ते समीपता ।
स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता- । तिसरी मुक्ती ॥ २४॥
त्या देवतेच्या लोकांत जाऊन राहणे याला स्वलोकता म्हणतात. समीप असावे यास समीपता मुक्ती म्हणतात. त्या देवतेचे स्वरूप प्रास होऊन सहाणे याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. ही तिसरी मुक्ती आहे. (२४)

देवस्वरूप जाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं ।
स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ २५॥
त्याला विष्णूचे रूप मिळाले तरी त्यास श्रीवत्स, कौस्तुभ मणी व लक्ष्मी यांची प्राप्ती होत नाही. स्वरूपता मुक्तीचे लक्षण हे अशा प्रकारचे आहे. (२५)

सुकृत आहे तों भोगिती । सुकृत सरतांच ढकलून देती ।
आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६॥
पुण्याचा साठा असेपर्यंत त्या त्या लोकातील भोग भोगावयास मिठ्यात. पुण्याचा पूर्ण क्षय झाला की तेधून ढकलून देतात. मात्र त्या लोकातील देव तेथे तसेच पूर्वीप्रमाणेच असतात. (२६)

म्हणौनि तिनी मुक्ति नासिवंत । सायोज्यमुक्ती ते शाश्वत ।
तेहि निरोपिजेल सावचित्त । ऐक आतां ॥ २७॥
म्हणून या तिन्ही मुक्ती नाशिवंत आहेत. सायुज्यमुक्ती ही अविनाशी आहे. ते कसे ते आता सांगतो. चित्त सावध ठेवून ऐकावे. (२७)

ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतासहित जळेल क्षिती ।
तेव्हां अवघेच देव जाती । मां मुक्ति कैंच्या तेथें ॥ २८॥
कल्पांती ब्रह्मांडाचा नाश होतो. पर्वतासहित भूमी जळून जाईल तेव्हा सगळे देवही जातात. तेव्हा मग तेथल्या मुक्ती कशा राहणार ? (२८)

तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ती तेहि अचळ ।
सायोज्यमुक्ती ते केवळ । जाणिजे ऐसी ॥ २९॥
याप्रमाणे कल्पांत जरी ओढवला तरी निर्गुण निश्चळ परमात्मा जशाच्या तसाच असतो. तो नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे निर्गुण भक्तीही अचलच असते. तिचाही नाश होत नाही. सायुज्यमुक्ती ही केवळ शाश्वत असते, हे जाणून घ्यावे. (२९)

निर्गुणीं अनन्य असतां । तेणें होये सायोज्यता ।
सायोज्यता म्हणिजे स्वरूपता- । निर्गुण भक्ती ॥ ३०॥
निर्गुण परमात्म्याशी अनन्य असणे हीच सायुज्यता होय. सायुज्यता म्हणजे स्वस्वरूपता. तिलाच निर्गुण भक्ती म्हणतात. (३०)

सगुण भक्ती ते चळे । निर्गुण भक्ती ते न चळे ।
हें अवघें प्रांजळ कळे । सद्गुकरु केलियां ॥ ३१॥
सगुण भक्ती चव्ये, निर्गुणभक्ती कधीही चळत नाही. हे काय रहस्य आहे, हे सद्‌गुरू केल्यावर स्पष्टपणे कळून येते. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मुक्तिचतुष्टयेनाम समास दहावा ॥ १०॥
इति श्रीदासवोधे गुरुशिष्यसंवादे ‘मुक्तिचतुष्टयनाम’ समास दहावा समाप्त. दशक चौथा समाप्त

॥ दशक चवथा समाप्त ॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: satsangdhara

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *