Skip to content
माया मोहोजाळे गुंतलोंसे – संत चोखामेळा अभंग – ९९
माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें ।
यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥
न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ ।
बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥
न घडे देवार्चन संतांचें पूजन ।
मन समाधान कधीं नव्हे ॥३॥
नसतेचि छंद लागती अंगासी ।
तेणें कासावीस जीव होय ॥४॥
चोखा म्हणे याही चोरें नागविलों ।
माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
माया मोहोजाळे गुंतलोंसे – संत चोखामेळा अभंग – ९९