मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥ कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥ आणिक तो दुजा नाहीं अधिकार । कैसा हा विचार करूं आतां ॥३॥ चोखा म्हणे बहु होती आठवण । कठिण कठिण पुढें दिसे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.