Skip to content
गोजिरें श्रीमुख चांगलें – संत चोखामेळा अभंग – ९
गोजिरें श्रीमुख चांगलें ।
ध्यानीं मिरवले योगीयांच्या ॥१॥
पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं ।
वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥
राई रखुमाई सत्यभामा नारी ।
पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥
वैजयंती माळ किरीट कुंडलें ।
प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
गोजिरें श्रीमुख चांगलें – संत चोखामेळा अभंग – ९