नाहीं देह शुद्ध याति अमंगळ । अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥ करूं जातां विचार अवघा अनाचार । आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥ वाणी नाहीं शुद्ध धड न ये वचन । धि:कारिती जन सर्व मज ॥३॥ अंगसंग कोणी जवळ न बैसे । चोखा म्हणे ऐसे जीवित माझें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.