तुम्हांसी शरण बहुत मागं आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥ तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥ नाहीं अधिकार उच्छिष्टा वेगळा । म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥ चोखा म्हणे मज कांहीं तें न कळे । नामाचिया बळें काळ कंठी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.