काय हें दु:ख किती – संत चोखामेळा अभंग – ६९
काय हें दु:ख किती – संत चोखामेळा अभंग – ६९
काय हें दु:ख किती ह्या यातना ।
सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥
जन्मावें मरावें हेंचि भरोवरी ।
चौर्यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥
तुम्हांसी करुणा न ये माझी देवा ।
चुकवा हा गोवा संसाराचा ॥३॥
चोखा म्हणे माझा निवारावा शीण ।
म्हणोनी लोटांगण घाली जीवें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
काय हें दु:ख किती – संत चोखामेळा अभंग – ६९