काय हें दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥ जन्मावें मरावें हेंचि भरोवरी । चौर्यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥ तुम्हांसी करुणा न ये माझी देवा । चुकवा हा गोवा संसाराचा ॥३॥ चोखा म्हणे माझा निवारावा शीण । म्हणोनी लोटांगण घाली जीवें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.