संत चोखामेळा अभंग

आम्ही कोणावरी सत्ता – संत चोखामेळा अभंग – ६३

आम्ही कोणावरी सत्ता – संत चोखामेळा अभंग – ६३


आम्ही कोणावरी सत्ता ।
करावी बा पंढरीनाथा ।
होईल साहाता दुजा ।
तत्त्वता तो सांगा ॥१॥
तूंचि बळिया शिरोमणि ।
आहेसि या त्रिभुवनीं ।
देवाधिदेव मुगुटमणि ।
कींव भाकणें यासाठीं ॥२॥
केला माझा अंगिकार ।
आतां कां करितां अव्हेर ।
तुमचा तुम्ही साचार ।
करा विचार मायबापा ॥३॥
जन्मोजन्मींचा पोसणा ।
तुमचाचि नारायणा ।
भाकितों करुणा ।
आना मना चोखा म्हणे ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आम्ही कोणावरी सत्ता – संत चोखामेळा अभंग – ६३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *