आतां कासया हा दाखवितां खेळ । म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥ जेथें ब्रम्हादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥ कोणासी हा पार न कळे तुमचा । काय बोलों वाचा कीर्ति तुमची ॥३॥ चोखा म्हणे तुमचा अवित हा खेळ । भुललें सकळ ब्रम्हांडचि ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.